सावलीसारखे सतत स्टार्ससोबत, पण स्वतःही आहेत सेलिब्रिटी ! कोण आहेत हे 5 बॉडीगार्ड्स?

बॉलीवूड अभिनेत्यांची सुरक्षा गेल्या काही काळात जास्त वाढवण्यात आली आहे. टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर इंडस्ट्री अलर्ट आहे. फिल्म इंडस्ट्रीतील 5 मोठ्या स्टार्सचे बॉडीगार्ड कोण ? चला जाणून घेऊया.

| Updated on: Oct 29, 2026 | 4:36 PM
1 / 6
काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेला गोळीबार आणि ऑक्टोबर महिन्यात टायगर श्रॉफवर करण्यात आलेली अंदाधुद फायरिंग यानंतर बॉलिवूड हादरलं असून, स्टार्सची सेक्युरिटी वाढवण्यात आली आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील 5 मोठ्य़ा स्टारचे बॉडीगार्ड कोण आणि ते किती लोकप्रिय आहेत, घ्या जाणून..

काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेला गोळीबार आणि ऑक्टोबर महिन्यात टायगर श्रॉफवर करण्यात आलेली अंदाधुद फायरिंग यानंतर बॉलिवूड हादरलं असून, स्टार्सची सेक्युरिटी वाढवण्यात आली आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील 5 मोठ्य़ा स्टारचे बॉडीगार्ड कोण आणि ते किती लोकप्रिय आहेत, घ्या जाणून..

2 / 6

अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील उघड शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे. सलमानच्या घरावर, गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारानंतर त्याच्या घराची सेक्युरिटी वाढवण्यात आली. पण सलमान खानकडे नेहमीच त्याचा पर्सनल बॉडीगार्ड असतो. शेरा याने सलमानच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. शेरा स्वत:देखील मोठा माणूस असून आता त्याचा मुलगाही इंडस्ट्रीत डेब्यू करण्यासाठी तयार आहे.

3 / 6

बॉलिवूडचे महानायक, अर्थात अमिताभ बच्चन. ते आता थेट लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आहेत. एवढंच नव्हे तर त्यांचा जुहू येथील 'जलसा' बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी देखील मिळाली होती, ज्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अमिताभ यांचा यक्तिक बॉडीगार्ड पण आहे, त्याचं नाव जितेंद्र शिंदे असं आहे.

4 / 6

शाहरुख खान हा फिल्म इंडस्ट्रीमधील सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे. त्याची लोकप्रियता जगभर आहे. सध्या तो लॉरेंस बिश्नोई गँगच्या टार्गेटवर नाही, पण एक काळ होता जेव्हा त्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळायच्या. शाहरुखने स्वतःचा वैयक्तिक बॉडीगार्ड ठेवलेला असून त्याचं नाव रवी सिंग आहे. रवि हा एखाध्या सावीलप्रमाणे सतत सुपरस्टारसोबत असतो. पण त्याचं वैयक्तिक आयुष्य त्याला लाईमलाईटपासून दूर ठेवायला आवडतं.

5 / 6

राम चरणचा बॉडीगार्ड केविन कुंटा अलीकडेच चर्चेत आला होता. ‘पेड्डी’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान त्याने आपल्या चपळाईने एका चाहत्याला राम चरणच्या जवळ जाण्यापासून रोखलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी केविनचे कौतुक केलें. या इव्हेंटनंतर केविनही एक लोकप्रिय व्यक्ती बनला. तो इटलीचा रहिवासी असून, तो अवघ्या 28 वर्षांचा आहे.

6 / 6

अक्षय कुमार हा चित्रपटसृष्टीतील मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. तो नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठीही खासगी बॉडीगार्ड तैनात असतो. त्याच्या बॉडीगार्डचे नाव श्रेयस ठेले आहे. श्रेयस सावलीप्रमाणे अक्षय कुमारसोबत असतो. अनेकदा तो या सुपरस्टारसोबत दिसला आहे. खासगी कामासाठी बाहेर जाण्यापासून ते व्यावसायिक कार्यक्रमांपर्यंत, अक्षय कुमारच्या 24 तासांच्या सुरक्षेची जबाबदारी श्रेयसवरच असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us