
Star Wife Education : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत, प्रत्येकजण लाइमलाइटमध्ये असतो. त्यांच्या पत्नींची देखील बरीच चर्चा असते. अनकेदा चाहते हे अभिनेत्यांच्या पत्नींबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या शिक्षणाबद्दलही अनेकदा चर्चा होत असते. गौरी खान ते मीरा राजपूत, सगळ्यात जास्त शिकलेलं कोण आहे ते जाणून घेऊया.

गौरी खान शाहरुख खान आणि गौरीचं लग्न 1991 साली झालं. गौरी खान चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती एक लोकप्रिय इंटीरियर डिझायनर आहे. तिने मुकेश अंबानी, करण जोहर, रॉबर्टो कॅव्हॅली सारख्या स्टार्ससाठी जागा डिझाइन केल्या आहेत. गौरी खान एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, गौरीने तिचे शालेय शिक्षण लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतलं. त्यानंतर तिने मॉडर्न स्कूल वसंत विहारमधून तिचे हायस्कूल पूर्ण केले. त्यानंतर गौरीने लेडी श्रीराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून इतिहासात बीए ऑनर्स केले. ग्रॅज्युएशननंतर गौरीने 6 महिन्यांचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला.

ट्विंकल खन्ना ट्विंकल खन्नाने तिचे शालेय शिक्षण पाचगणी येथील न्यू एरा हायस्कूलमधून केले. त्यानंतर तिने नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड एज्युकेशनमधून ज्युनियर कॉलेजचे शिक्षण घेतले. ट्विंकल खन्नाने 2023 मध्ये लंडनच्या गोल्डस्मिथ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तिने पदवीदान समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ट्विंकल खन्ना ही एक लेखिका, स्तंभलेखिका, इंटिरियर डिझायनर, चित्रपट निर्माती आणि माजी अभिनेत्री आहे. तिचे लग्न अक्षय कुमारशी झालं आहे.

किरण राव बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याच्याशी किरण रावचं लग्न झालं होतं मात्र, आता दोघांचाही घटस्फोट झाला आहे. 15 वर्षांच्या लग्नानंतर ते वेगळे झाले. किरण रावच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, किरणने तिचे शालेय शिक्षण कोलकात्यातील लोरेटो हाऊसमधून केले आहे. त्यानंतर तिने सोफिया कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथून तिने पदव्युत्तर पदवी घेतली. तिने असोसिएट डायरेक्टर म्हणून सुरुवात केली. आता ती दिग्दर्शक, निर्माती, पटकथालेखक म्हणून काम करते

सुनिता आहूजा गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. सुनीता एका पंजाबी कुटुंबातील आहे. सुनीता हिने तिचे शालेय शिक्षण ख्रिश्चन शाळेतून केले. त्यानंतर तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

मीरा राजपूत मीरा राजपूतचे लग्न अभिनेता शाहिद कपूरशी झाले आहे. 2015 साली ते लग्नबंधनात अ़कले. ते अरेंज मॅरेज होतं. या दोघांना दोन मुलंही आहेत. मीरा राजपूत अभिनयाच्या दुनियेपासून दूर आहे. पण, ती ग्लॅमरच्या दुनियेतच राहते. ती दिल्लीची आहे. मीराने दिल्लीतील इंडस व्हॅली स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिने लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. मीरा अभ्यासात खूप हुशार होती.