
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठापनेच्या भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

राम लल्लाचे आणि अगोध्येतील मंदिराच्या फोटोंबद्दल सर्वांमध्येच मोठे आकर्षण हे बघायला मिळतंय. या भव्य सोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते.

आता राम लल्लाचे अत्यंत खास आणि एचडी फोटो हे पुढे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल अयोध्येतील राम मंदिरात पूजा करण्यात आली.

या सोहळ्याला बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार हे उपस्थित होते. कंगना राणावत तर जबरदस्त लूकमध्ये या सोहळ्यात पोहचली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अकरा दिवसांचा उपसा काल राम मंदिरात सोडला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भाषण देखील केले.