शेवटी संशयाच्या भुताने डाव साधलाच! दारुड्या नवऱ्याने पत्नीसोबत केलं असं काही की…

गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका दारुड्या पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. या घटनेनंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

| Updated on: Sep 08, 2025 | 9:38 PM
1 / 5
पती-पत्नीचं नातं फारच पवित्र समजलं जातं. एकदा लग्नबंधनात अडकल्यानंतर आयुष्यभर अडीअडचणीत साथ द्यायची असं ठरवलं जातं. पण याच नात्यात कधीकधी मिठाचा खडा पडला की होत्याचं नव्हतं होतं. गडचिरोलीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

2 / 5
येथे आरोपी पतीने दारूच्या नशेष आपल्याच पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

3 / 5
लग्नाला 10 वर्षे झालीत, दोन मुलेही झाली, पण आरोपीच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल असलेला संशय दूर होत नव्हता. अखेर त्याने दारूच्या नशेत आपल्या संतापाच्या भरात पत्नीचा गळा आवळला आणि तिचा खून केला.

4 / 5
पतीने दारुच्या नशेत पत्नीला संपवल्यामुळे आता त्या दाम्पत्याची दोन छोटी मुले आईच्या मायेला पोरकी झाली आहेत. हा सर्व प्रकार कोरची तालुक्यातील सोनपूर या गावी घडला.

5 / 5
टामिनबाई पुरूषोत्तम कचलाम (34 वर्ष) असे मृत पत्नीचे नाव, तर पुरूषोत्तम गजराज कचलाम (34 वर्ष) असे आरोपी पतीचे नाव आहे. कोरची पोलिसांनी आरोपी पुरूषोत्तमला अटक केली असून आज त्याला न्यायाल्यासमोर हजर करण्यात येणार आहे