छत्रपती संभाजीनगरच्या बड्या अधिकाऱ्याच्या लेकीसोबत घडले भयंकर, थेट लंडनहून पुण्यात पण कुटुंबियांना थांग पत्ता नाही, मैत्रिणींनी..
छत्रपती संभाजीनगरच्या बड्या माजी अधिकाऱ्याच्या लेकीबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली. लेक लंडनहून दोन महिन्यांपूर्वीच भारतात आली. पण तिने याबाबतची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली नाही. लेकीला पाहून आई वडिलांना धक्का बसला. कुटुंबियांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.

लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेचे निवृत्त मुख्य शहर अभियंता अविनाश देशमुख यांची लेक मुग्धा देशमुख थेट पुण्यात आली होती. मात्र, तिने ही गोष्ट आपल्या कुटुंबियांपासून लपून ठेवली. ती पुण्यातील गहुंजे येथील आलिशान सोसायटी असलेल्या लोढा बेलमोंडो येथील वास्तव्यास होती. भारतात येऊनही तिने याबाबतची कोणतीही कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली नाही. मुग्धा ही जुलै 2025 मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. 23 ऑक्टोबर 2026 रोजी तिचे आपल्या आईसोबत अखेरचे बोलणे झाले. ती लंडनमध्ये गेल्यापासून आपल्या कुटुंबियांच्या सतत संपर्कात होती. तिने अखेरच्या कॉलमध्ये मी मुलाखतीसाठी जात असल्याचे आपल्या आईला सांगितले. पण त्यानंतर तिच्यासोबत कुटुंबियांचा कोणताही संपर्कच झाला नाही. कुटुंबियांनी अनेकदा संपर्क केला पण तिचा फोन सतत बंदच येत होता.
मुलगी कुठे आणि कशी आहे, याची चिंता आई वडिलांना झाली. अनेक प्रयत्न करूनही तिचा संपर्क शेवटपर्यंत झालाच नाही. कुटुंबियांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणींसोबत संपर्क केला. पण कुटुंबियांना समजले की, ऑगस्ट 2026 मध्येच मुग्धाने लंडन सोडले. दोन महिन्यांपूर्वीच मुग्धा ही भारतात परतली पण याची दूरपर्यंत माहिती कुटुंबियांना नव्हती. त्यानंतर आपली मुलगी नक्की कुठे आहे, याची काळजीत कुटुंबियांनी थेट उस्मानपुरा पोलिस स्टेशन गाठले.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. तिचे मोबाईल लोकेशन, बँक खात्याची तपासणी करण्यात आली. यात धक्कादायक माहिती पुढे आली. मुग्धाच्या क्रेडिट कार्डचा वापर भारतातील झोमॅटो, स्विगी अशा ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्सवर सातत्याने होत असल्याचे स्पष्ट झाले. काही तांत्रिक पुराव्यातही स्पष्ट झाले की, ती भारतातच आहे. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने माहिती मिळवली की, मुग्धा ही गहुंजेयेथील लोढा बेलमोंडो सोसायटीत आहे. पोलिस तिथे पोहोचले त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून बंद होता.
पोलिसांनी बनावट चावीच्या मदतीने तो दरवाजा उघडला. त्यानंतर मुग्धा ही थेट मृत अवस्थेत पोलिसांना दिसून आली. फ्लॅटमध्ये एसी आणि फॅनही सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मुग्धाच्या आजुबाजूला काही औषधे मिळून आली. पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास हा केला जात आहे. 21 ऑक्टोबर रोजीच मुग्धाने आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला काम बंद करण्यास सांगितले होते. मुग्धाला भारतात येऊन काही महिने झाली तरीही तिने याबाबत आपल्या कुटुंबियांना कोणीतीही माहिती दिली नाही.
