
मोहम्मद इरफान, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी नक्षल कारवाई झाली आहे. नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केल्याचं समोर आलं आहे. या जाळपोळीचे फोटोही समोर आलेत

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एक जेसीबी जाळली आहे. तसंच तीन ट्रॅक्टरचीही जाळपोळ केली आहे. या जाळपोळीमुळे जेसीबी आणि ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालं आहे.

भामरागड तालुक्यातील हिदुर पोयरकोटी या रस्त्याचं काम काही दिवसापासून सुरू झालं आहे. या कामासाठी काही वाहनं या परिसरात आहेत.

काल रात्री दहा वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या कामाच्या ठिकाणी येत वाहनाची तोडफोड केली. तसंच जाळपोळही केली. यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

भामरागड तालुक्यातील हिदूर इथली ही घटना आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली तालुक्यात नक्षलवादी पुन्हा ऍक्टिव मोडवर दिसत आहेत.