
26 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी शुक्र ग्रह मिथुन राशीत गोचर करेल. या काळात मिथुन राशीत आधीपासून असलेल्या गुरू (बृहस्पति) सोबत शुक्राची युती होईल, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. हा योग ज्योतिष शास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो, कारण तो धन, समृद्धी आणि सुख-सुविधांना वाढवणारा आहे. हा योग 24 वर्षांनंतर पुन्हा तयार होत आहे; यापूर्वी हा योग 2001 मध्ये दिसला होता. मिथुन राशीत बनणाऱ्या या शुक्र-गुरू युतीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळेल.

गजलक्ष्मी योग तेव्हा तयार होतो जेव्हा शुक्र आणि गुरू एकाच राशीत येऊन युती करतात. शुक्र हा धन, वैभव, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक आहे, तर गुरू हा ज्ञान, समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक आहे. या दोघांच्या युतीमुळे आर्थिक प्रगती, करिअरमधील यश आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. मिथुन राशीत बनणारा हा योग राहूच्या पंचम दृष्टीच्या प्रभावाखाली असेल, ज्यामुळे काही राशींना चतुराई आणि रणनीतीने लाभ मिळेल. चला, जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग शुभ ठरणार आहे.

धनु राशीच्या लोकांसाठी हा योग सातव्या भावात तयार होईल आणि शुक्र-गुरूच्या सप्तम दृष्टीमुळे विशेष लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. कायदेशीर प्रकरणांत निर्णय तुमच्या बाजूने येईल आणि करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. संधी ओळखा आणि तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी योग पंचम भावात तयार होईल, जो शिक्षण, संतान आणि प्रेमाशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील आणि प्रेमसंबंधात सुधारणा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून लाभ होईल आणि संतानाकडून शुभ बातम्या मिळू शकतील. तुमच्या सर्जनशीलतेचा वापर करा आणि मोठ्या वचनांपासून दूर राहा. माता दुर्गेच्या मंदिरात तुपाचं दान करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी पहिल्या भावात गजलक्ष्मी योग तयार होईल, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व निखरेल आणि आत्मविश्वास वाढेल. हा योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. तसेच, वडिलोपार्जित संपत्तीमुळे लाभ मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक मान-सन्मान वाढेल आणि कुटुंबात मंगल कार्ये होऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. या काळात वाहन किंवा संपत्ती खरेदीचे शुभ योग बनत आहेत. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि महिलांचा आदर करा. माता लक्ष्मीची पूजा आणि शुक्रवारी दान केल्याने लाभ वाढेल.

तुळ राशीच्या लोकांसाठी हा योग नवम भावात तयार होईल, जो भाग्य आणि धर्माशी संबंधित आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळेल, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल आणि लांबच्या प्रवासातून फायदा होईल. वडील किंवा गुरूंकडून मदत मिळू शकते आणि प्रेम तसेच वैवाहिक जीवनात गोडवा येईल. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. माता लक्ष्मीची पूजा आणि दान-पुण्य केल्याने दुप्पट लाभ होईल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी दुसऱ्या भावात गजलक्ष्मी योग तयार होईल. या काळात धनलाभाचे नवे अवसर मिळतील. नोकरीत बढती किंवा पगारवाढ होऊ शकते. संगीत, कला किंवा सर्जनशील कार्यांमध्ये रुची वाढेल आणि कुटुंबात शुभ कार्ये होतील. नवे कपडे किंवा दागिने खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ आहे. माता लक्ष्मीची पूजा करा आणि गायीला अन्न दान करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)