
तुमच्या मनात आलं असेल की, भारतात असणार. पण नाही गणपतीची सर्वात मोठी मुर्ती भारतात नाही... तर दुसऱ्या कुठल्यातरी देशात सर्वात मोठी गणरायाची मुर्ती आहे. जगातील सर्वात उंच गणेशमूर्तीबद्दल जाणून घेऊया.

जगातील सर्वात उंच गणेशमूर्ती थायलंडमधील ख्लोंग खुएन गणेश आंतरराष्ट्रीय उद्यानात आहे. थायलंडच्या चाचोएंगसाओ प्रांतात बांधलेली ही गणेशमूर्ती 128 फूट (39 मीटर) उंच आहे. 12 मजल्याच्या इमारती एवढी गणपतीची मुर्ती आहे.

या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती 854 कांस्य तुकड्यांपासून बनवलेली आहे आणि त्यावर गणेशाचे 4 हात आहेत. गणेशाच्या 4 हातात ऊस, केळी, आंबा आणि फणस आहे, जे थायलंडमध्ये शेतीचं प्रतीक मानलं जातात.

या गणेशमूर्तीच्या पायाजवळ एक मोठा उंदीरही बनवण्यात आला आहे, ज्याच्या हातात मोदक आहेत. ज्या उद्यानात ही मूर्ती आहे ते थायलंडमधील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे आणि ते 40 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे.

थायलंडमध्ये भगवान गणेशाला 'फ्रा फिकनेट' म्हणून ओळखलं जातं आणि यश, समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव म्हणून गणरायाची पूजा केली जाते. येथील लोकांची गणेशावर गाढ श्रद्धा आहे.