गणपती बाप्पाच्या पूजेत शिंका येणं शुभ की अशुभ? शिंका आली तर काय करावे? जाणून घ्या

गणपती पूजेच्या वेळी शिंक येणे अनेकांना चिंताग्रस्त करते. काही मान्यतांनुसार, पूजेपूर्वी शिंक अशुभ मानली जाते, तर काही मान्यतांनुसार दिशेनुसार शिंका शुभ असते. उत्तरे किंवा पश्चिमेकडून शिंक सौभाग्य दर्शवते, तर ईशान्येकडून शिंक धनलाभ सूचित करते. शिंक आल्यास थोडावेळ थांबून पाणी प्यावे आणि नंतर पूजा सुरू करावी.

| Updated on: Aug 26, 2025 | 4:05 PM
1 / 8
अवघ्या काही तासातच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या पूजेनिमित्त घरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण असते. मात्र अनकेदा पूजा करताना किंवा शुभकार्य सुरू करण्यापूर्वी काहींना शिंका येते.

2 / 8
सामान्यतः शिंका येणे ही एक शारीरिक क्रिया असली, तरी भारतीय परंपरा आणि शास्त्र याला विशेष महत्त्व आहे. जर एखादी व्यक्ती पूजेच्या वेळी शिंकली तर अनेकदा लोक चिंता व्यक्त करतात. कारण काही मान्यतांनुसार शुभ कार्यापूर्वी शिंक येणे अशुभ मानले जाते.

3 / 8
धार्मिक मान्यतांनुसार, कोणत्याही शुभ कार्य किंवा पूजेची सुरुवात करताना शिंका आल्यास ते अशुभ मानले जाते. गणपतीची पूजा सुरू करण्यापूर्वी किंवा आरती करताना शिंक आल्यास त्याला तुमच्या कार्यात अडथळे येण्याचे संकेत मानले जाते.

4 / 8
जर तुम्हाला गणपतीची पूजा करताना शिंका आली, तर तुम्ही थोडावेळ थांबा. यानंतर पाणी प्या. चूळ भरा आणि नंतर पुन्हा पूजा सुरू करू शकता. यामुळे कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही.

5 / 8
शास्त्रानुसार प्रत्येक शिंक अशुभ नसते. गणपतीच्या पूजेदरम्यान काही विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट दिशेने शिंका आल्यास ते शुभ मानले जाते.

6 / 8
गणपतीच्या पूजेदरम्यान तुम्हाला उत्तर किंवा पश्चिम दिशेकडून शिंकेचा आवाज ऐकू आला, तर हे सौभाग्य आणि नवीन संधींचे संकेत मानले जाते. तसेच, यामुळे करिअरमध्ये प्रगती होते, असा योग असतो.

7 / 8
तसेच जर ईशान्य दिशेकडून शिंकेचा आवाज ऐकू आला, तर ते धनलाभ आणि घरात समृद्धी येण्याचे संकेत मानले जाते. गणपती ही समृद्धीचा देवता मानली जातो, त्यामुळे ही शिंक विशेषतः शुभ मानली जाते. जर एखाद्या दुःखाच्या प्रसंगात तुम्हाला शिंका आली, तर ते एक शुभ संकेत मानले जाते. यापुढे भविष्यात अशाप्रकारे शुभ घटना घडणार नाही, हे दर्शवते.

8 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)