
अंबानी कुटुंबात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा अँटिलियातील गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा आहे. गणेश उत्सवात अनेक मोठमोठे स्टार अंबानी यांच्या घरी आले होते. तिथले फोटो समोर आले आहेत. ( Credit: ambani_update/Instagram)

सिंगर हर्षदीप कौर अँटीलियात गणपती बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेली. तिथला नीता अंबानींसोबतचा फोटो तिने शेअर केला. या फोटोमध्ये नीता अंबानी यांच्या लूकने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. नीता अंबानी यांनी भगव्या रंगाची साडी परिधान केली आहे. ( Credit: harshdeepkaurmusic/Instagram)

या भगव्या साडीसोबत नीता अंबानी यांनी हाय नेक ब्लाउज पेयरअप केला आहे. त्यावर गोल्डन बनारसी प्रिंट आहे. याला गोल्डन बॉर्डर देण्यात आली आहे. नीता अंबानी यांनी 200 वर्ष जुना रत्नजडीत हार घातला आहे. या हारामुळे त्यांचा लूक खूपच आकर्षक बनला. सोबत मॅचिंग इयरिंग्स आहेत.

नीता अंबानी या फोटोत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांनी जामदानी बनारसी साडी परिधान केली आहे. यात खऱ्या सोन्याचं आणि चांदीच जरीकाम केलेलं आहे. सोबत नीता यांनी गोल्ड नेकलेस घातला आहे. ( Credit: manishmalhotra/Instagram)

नीता अंबानी यांचा या सिंपल साडीमध्ये सुद्धा क्लासी लुक वाटतो. त्यांनी रॉयल अजूरे सिल्क साडी नेसली आहे. यात रेशमची बॉर्डर आहे. यात जरदोजी आणि सिल्वरच वर्क सुद्धा आहे. नीता यांनी काळी टिकली आणि मेकअपने लुक कम्पलीट केलाय.