
इंडोनेशियामधील प्रम्बानन मंदिरातील ही मूर्ती सर्वात जुनी आहे. ही 9 व्या शतकातील मूर्ती आहे.

थायलंडमधील ख्लॉग ख्वान्ग गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती आहे. हा गणपती बाप्पा जवळपास 39 मीटर उंच आहे.

अफगाणिस्तानातील महाविनायक असाच सुंदर आहे. काबुल जवळील गार्देझ येथे हा बाप्पा सापडला होता. ही मूर्ती 24 इंच उंच आहे. ही मूर्ती पाचव्या अथवा सहाव्या शतकातील असल्याचा दावा करण्यात येतो.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील अष्टदशभुज गणेश मंदिरातील बाप्पाची मूर्ती आगळीवेगळी आहे. या गणेशाला 18 हात आहेत.

राजस्थानमधील रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेश मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथील बाप्पााला तीन डोळे आहेत.

आंध्रप्रदेश येथील चित्तूर मधील कनिपक्कम गणेश मंदिर जगातील एक युनिक मंदिर आहे. येथील गणपत्ती बाप्पा चक्क एका विहिरीत विराजमान आहे.