
आज, २७ ऑगस्ट रोजी राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. चहा पाहूया मराठी कलाकारांच्या घरचा गणपती...

अभिनेत्री रुपाली भोसले दरवर्षी गणेश चतुर्थीला बाप्पाच्या स्वागातीची जोरदार तयारी करते. यंदाही तिने बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात केले आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही दरवर्षी गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करते. तिने यंदा देखील अतिशय सुंदर असे डेकोरेशन करत बाप्पाचे स्वागत केले आहे.

अभिनेत्री सायली संजीवने बाप्पाचे स्वागत केले आहे. तिने बाप्पासाठी सुंदर सजावट केली आहे.

अभिनेता सुबोध भावेच्या मुलाने गणपती बाप्पासाठी खास डेकोरेशन केले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडेकर यांच्या घरीही यंदा लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात आणि श्रद्धेने खांडेकर कुटुंबाने बाप्पाचं स्वागत केलं. घरी सजावट, फुलांची आरास आणि मंगलमय वातावरणात ‘गणरायाला’ विराजमान करण्यात आलं.

मराठी बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा. कमरेला ढोल बांधत शिव ठाकरे याने वाजवला ढोल यावेळी शिव ठाकरे याने आपल्या 75 वर्षाच्या आजी सोबत ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला..

दरवर्षीप्रमाणे मोठ्या थाटामाटात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी देखील गणपती बाप्पाच आगमन झाला आहे पर्यावरण पूरक अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीची निर्मिती सोनालीने आपल्या हाताने केली आहे,ह्या वर्षी गणपती बाप्पा साठी पर्यावरण पूरक अशी सजावट देखील करण्यात आली आहे