गणपती बाप्पाच्या मुलीचे नाव माहितीये का? तिची भक्ती केल्यास मिळतो खास आशीर्वाद

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, गणपती बाप्पांच्या लाडक्या कन्येची अनोखी कथा आपण जाणून घेणार आहोत. ही कथा जुन्या ग्रंथांमध्ये नसली तरी, ती जनमानसात रुजलेली आहे. ही कथा केवळ कथा नसून, जीवनातील समाधानाचे महत्त्व शिकवते.

| Updated on: Aug 26, 2025 | 5:02 PM
1 / 8
 गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा जयघोष आपल्याला पाहायला मिळणार आहे. विघ्नहर्ता, बुद्धीची देवता आणि सर्व देवांमध्ये गणपती बाप्पा हा प्रथम पूजनीय मानतो, त्यांच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत.

2 / 8
सर्वसामान्यपणे गणपती बाप्पा हे ब्रह्मचारी आहेत असे मानले जाते. त्यांच्यासोबत रिद्धी आणि सिद्धी या त्यांच्या दोन पत्नींची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहितीये का की गणपती बाप्पा एक कन्याही आहे.

3 / 8
एका अनोख्या कथेनुसार गणपती बाप्पांना एक लाडकी कन्या आहे. संतोषी माता असे तिचे नाव आहे. गणपती बाप्पाच्या मुलीची ही कथा जुन्या धार्मिक ग्रंथांमध्ये थेट आढळत नाही, पण ती लोकांच्या मनात आणि परंपरेत रुजलेली एक हृदयस्पर्शी कहाणी आहे.

4 / 8
विशेषतः १९७५ साली प्रदर्शित झालेल्या जय संतोषी माँ या चित्रपटाने ही कथा घराघरात पोहोचवली. त्यामुळे संतोषी मातेची ओळख संपूर्ण भारताला झाली. एकदा नारद मुनी गणपती बाप्पाकडे गेले आणि त्यांनी गणपतीकडे एक बहीण मागितली.

5 / 8
नारदांचे म्हणणे ऐकून गणपतीने आपल्या अद्भुत शक्तीतून एका तेजस्वी कन्येला जन्म दिला. तिचे नाव ठेवण्यात आले 'संतोषी'. तिच्या नावाप्रमाणेच, ती आपल्या भक्तांना सुख, समाधान आणि संतोष देईल, असे गणपती बाप्पाने सांगितले.

6 / 8
संतोषी माता ही विशेषतः शुक्रवारची देवी मानली जाते. या दिवशी त्यांचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते, असे मानले जाते. या व्रतामध्ये आंबट पदार्थ खाणे पूर्णपणे वर्ज्य असते.

7 / 8
जे भक्त पूर्ण श्रद्धेने संतोषी मातेची पूजा करतात, त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. घरात शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहतो. गणपती बाप्पाच्या या लाडक्या मुलीची कथा ही केवळ एक कहाणी नसून, ती आपल्याला जीवनात समाधान आणि आनंदाचे महत्त्व शिकवते.

8 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)