
गरुड पुराणात जन्म, मृत्यू तसेच पुनर्जन्माबाबत सांगितलेले आहे. याच गरुडपुराणात तुमच्या दुर्दैवी नशिबाच्या पाच लक्षणांबाबत सांगितलेले आहे. तुमच्या आयुष्यात या पाच घटना घडत असतील तर तुम्ही फार दुर्दैवी असून तुमच्या भाग्यातही वाईट घडणार आहे, असे समजावे.

गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत भांडत राहणारी पत्नी घरातील सुख आणि शांती सगळं नष्ट करते. अशी स्त्री दोघांचेही भवितव्य अंधारात टाकते. सततच्या भांडणांमुळे आर्थिक हानी, आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

या दुर्भाग्यातून मुक्ती हवी असेल तर दोघांनीही संयम ठेवावा तसेच विनम्रतेने भांडणे सोडवावीत. पत्नीने हनुमान चालीसा म्हणावी. तर पतीने ओम नमो भगवते वासूदेवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्यास घरात सुख आणि शांती नांदते.

गरुड पुराणात पैशांचा अभाव असेल आणि पुन्हा पुन्हा आर्थिक संकट येत असेल तर आयुष्यात दुर्दैवाचा काळ समोर आल्याचे समजावे. हे संकट आयुष्यात आले असेल तर घरातील मीठाचा डब्बा नेमही भरलेला असावा. काळा तीळ आणि काळ्या कपड्यांचे दान करावे. रोज 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः' या लक्ष्मी स्त्रोताचे जप करावे. असे केल्यास घरात धन येते. तसेच आर्थिक अडचणही नाहीशी होते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.