
आजकाल कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना त्यांच्या जीवनाविषयी माहिती देत असतात. अनेकदा ते चाहत्यांशी संवाद देखील साधतात. नुकताच मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने देखील चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान, एका यूजरने त्याला विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले...

गश्मीर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामच्या आस्क मी एनीथिंगच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने अभिनेत्री प्राजक्ता माळी संबंधी प्रश्न विचारला होता.

एका चाहत्याने तू प्राजक्ता माळीला इन्स्टाग्रामवर का फॉलो करत नाहीस? तुम्ही एकत्र खूप छान काम केले आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावर गश्मीरने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

गश्मीरने त्या चाहत्याला उत्तर देत प्राजक्ता माळीला टॅग केले आहे. तसेच कृपया तूच सांग त्यांना की तुला का फॉलो करत नाही असे लिहिले आहे.

प्राजक्ता आणि गश्मीरने फुलवंती या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांचा हा चित्रपट चांगला गाजला होता.