Gatari Amavasya: ‘गटारी’च्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान

Gatari Amavasya: श्रावण महिना सुरु होण्याआधी आषाढाची सांगता दीप अमावस्येने होते. यादिवशी दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. अनेकजण दीप अमावस्येला गटारी देखील म्हणतात. पण या पवित्र दिवशी चुकीच्या गोष्टी केल्यास नक्कीच त्याचा फटका बसू शकतो असे शास्त्रात म्हटले आहे.

| Updated on: Aug 11, 2026 | 9:15 AM
1 / 5
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या येते. या अमावस्येला आषाढ अमावस्या असेही म्हणतात. काही जणांसाठी मात्र ही अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या असते. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच्या या दिवशी अनेक जण पार्टीच्या मूडमध्ये असतात. श्रावणात धार्मिक विधी, पूजा आणि व्रत पाळल्या जात असल्याने बहुतेक लोक सात्विक व शुद्ध आहार घेतात. त्यामुळे आषाढाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दीप अमावस्येला मनसोक्त मांसाहार आणि मद्यपान करून पार्टी करण्याची प्रथा काहींमध्ये दिसून येते. कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो आणि या महिन्यात मांसाहार-मद्यपान वर्ज्य मानले जाते. पण गटारीच्या दिवशी काही गोष्ट करणे टाळाव्यात. कारण त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

2 / 5

जर तुम्ही आषाढ अमावस्येला गटारी म्हणून पार्टी करत असाल, तर त्याचा आनंद फक्त एक दिवस मिळेल, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. दीप अमावस्या हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देवाची पूजा केली जाते, दिव्यांची पूजा होते आणि पितरांचे तर्पण व पूजनही केले जाते. काही घरांमध्ये मुलांचे दिव्यांनी औक्षण करण्याची प्रथा आहे. यामागे वंशाच्या दिव्याला (पुढच्या पिढीला) उज्ज्वल भविष्य, आरोग्य आणि सुखाची प्रार्थना करण्याचा भाव असतो. अशा पवित्र दिवशी जर पार्टी आणि अयोग्य कृत्यांना प्राधान्य दिले, तर पितरांचा रोष ओढवू शकतो, असे सांगितले जाते.

3 / 5

आषाढ किंवा दीप अमावस्येला सकाळी लवकर उठून नदीवर स्नान करण्याची परंपरा आहे. नदी जवळ नसल्यास अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करता येते. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. संध्याकाळी दिव्यांची पूजा करावी आणि पितरांना नैवेद्य दाखवावा.

4 / 5

यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात, पितृदोष दूर होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते. या दिवशी सेलिब्रेशनच्या नादात वाईट गोष्टी किंवा चुकीचे कृत्य केल्यास पितरांचे आशीर्वाद तर दूरच, आयुष्यात अडचणी, संकटे आणि पीडाही पाठ सोडत नाहीत. अशा लोकांची कामे अडतात, मेहनत करूनही यश मिळत नाही. अनेकदा आपण नकळत चुका करतो आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागतात. म्हणून दीप अमावस्येला चुकीच्या गोष्टी टाळा. दिव्यांचे आणि पितरांचे मनोभावेने पूजन करा.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us