AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रवाशांचे होणार मेगाहाल, मुख्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

पायाभूत सुविधांच्या देखभाली आणि सुरक्षिततेसाठी हे मेन्टेनन्स ब्लॉक घेणे आवश्यक आहेत. या मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रवाशांचे होणार मेगाहाल, मुख्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
sunday mega block
| Updated on: Sep 25, 2026 | 7:01 PM
Share

गणेश उत्सवात मेगाब्लॉक रद्द केल्याने सुखावलेल्या मुंबईकरांचे आता या रविवारी दि.२७ सप्टेंबर रोजी लोकल प्रवासात हाल होणार आहेत. कारण उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

यामुळे खालील प्रमाणे लोकल सेवा प्रभावित होतील

मेन लाईन:

ब्लॉक: माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर स. ११.०५ ते दु. ३.४५ वा.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे स्थानकाच्या पुढे मुलुंड स्थानकावर या लोकल पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल गाड्या मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील, माटुंगा स्थानकानंतर त्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

दुपारी १.४८ वाजता खोपोली येथून सुटणारी खोपोली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल आता दुपारी २.०६ वाजता सुटेल अशा प्रकारे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

हार्बर लाईन:

कुर्ला – वाशी अप आणि डाऊन हार्बर लाईन: स. ११.१० ते सायं. ४.१० वा.

सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील लोकल फेऱ्या आणि सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप हार्बर लाईन वरील लोकल सेवा रद्द राहणार आहेत.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल – वाशी – पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हार्बर लाईनवरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांद्वारे प्रवास करण्याची मुभा असेल.

पश्चिम लाईन

कुठे : वसई रोड-भाईंदर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवार २६ सप्टेंबर मध्यरात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम: जम्बो ब्लॉकच्या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोड आणि बोरिवली/भाईंदरदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार नाही

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत