
अदानी कुटुंब पुन्हा क्रमांक एकवर आले आहे. 2025 च्या बार्कलेज प्रायव्हेट क्लाईंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस यादीत त्यांनी क्रमांक पटकवला आहे.

या श्रेणीत सलग दुसऱ्या वर्षी अदानी कुटुंब 14 लाख कोटींच्या व्यवसायांसह 20 सर्वात मौल्यवान पहिल्या पिढीतील व्यावसायीक भारतीय कुटुंबात अव्वल स्थानी आहे.

गौतम अदानी यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. या समूहाकडे 14 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप आहे. अदानी इंटरप्राइजेज, अदानी पोर्ट्स आणि इतर समूह मिळून हे संयुक्त व्हॅल्यूएशन येते.

या यादीत दुसऱ्या स्थानावर सायरस पुनावाला यांचे पुनावाला कुटुंब आहे. ते सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी चालवतात. या कंपनीचे व्यवसाय मूल्य 2.3 लाख कोटींच्या घरात आहे.

तर डीव्ही कंपनीचे के मुरली यांच्या कंपनीचे मूल्यांकन 1.8 लाख कोटी असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

या तिन्ही कुटुंबांच्या व्यवसायाचे मूल्यांकन 471 अब्ज डॉलर्स इतके 40.4 लाख कोटी रुपये आहे. यंदा त्यात 4.6 लाख कोटींची वाढ झाली आहे. या तिन्ही कुटुंबांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य हे फिलिपिन्स या देशाच्या जीडीपीइतके आहे.