
सिंघम चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवाल गौतम किचलूसोबत विवाहबद्ध झाली आहे. लग्नाआधी दोघांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये फोटोशूट केला आहे.

लग्नाआधी गौतम हॉटेलमध्ये फोटोशूट करताना दिसला. त्याने यावेळी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

गौतम किलचू हा एक व्यावसायिक आहे. तो 'डिसर्न लिवींग' या ब्रॅन्डचा मालक आहे.

गौतम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे इन्टेरिअरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

काजल आणि गौतमची लग्नाआधीचे काही कार्यक्रम मुंबईत पार पडले. यात त्या दोघांच्या हळद, मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.