Gautami Patil: गौतमी पाटीलने शेअर केले माधुरी दीक्षितसोबतचे फोटो; म्हणाली, “काही भेटी फक्त…”

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर गौतमी पाटील आणि माधुरी दीक्षित यांची खास भेट झाली. या भेटीचे सुंदर फोटो गौतमीने सोशल मीडियावर शेअर केले असून, हे फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

| Updated on: Nov 02, 2026 | 9:56 AM
1 / 7
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली होती.

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली होती.

2 / 7

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बॉलिबूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दिक्षित करत आहे. या खास भागात माधुरी दिक्षित आणि गौतमी पाटील या दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र आल्याचं पहायला मिळालं.

3 / 7

'कोण होणार करोडपती'च्या मंचावरील खास फोटो गौतमी पाटील हिने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

4 / 7

या फोटोंमध्ये गौतमीने निळ्या रंगाची पारंपरिक पैठणी साडी आणि सुंदर दागिने परिधान केले आहेत. तर माधुरी दिक्षितने पिवळ्या-लाल रंगाची आकर्षक साडी परिधान केली आहे.

5 / 7

गौतमीने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये ती अतिशय आदराने माधुरी दिक्षित यांच्या पाया पडताना दिसत आहे.

6 / 7

हे फोटो शेअर करताना तिने सुंदर कॅप्शन दिलं आहे. ती म्हणाली, "काही भेटी या फक्त आठवणी नसतात, तर आयुष्यभरासाठी प्रेरणा देऊन जातात! एका बाजूला अभिनय आणि सौंदर्याची जादू, तर दुसऱ्या बाजूला स्वप्नांच्या प्रवासातील एक सुंदर क्षण… बॉलीवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित मॅम यांच्यासोबतचा हा अविस्मरणीय क्षण!"

7 / 7

हे सुंदर फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून कंमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us