
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर, ठुमक्यांवर डोलायला लावणारी, ठेका धरायला लावणारी नृत्यांगला गौतमी पाटील खूप फेम आहे. ती नेहमीच चर्चेत असते. (photos - Instagram / official_gautami941__)

तिचं खासगी आयुष्य, शिक्षण, कमाई, तिला काय आवडतं, या सर्वांबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना बरीच उत्सुकता असते.सबसे कातिल गौतमी पाटील अशी तिची ख्याती आहे.

गौतमी सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असून तिथे ती नवनवे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. दिवाळीमिनित्त गौतमीने काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोसंह तिने सुंदर कॅप्शन लिहीत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. खास गोष्ट म्हणजे या फोटोंमधून गौतमीच्या घराची झलकही तिच्या चाहत्यांना पहायला मिळत आहे.

साधा सुंदर चुडीदार, हातात पणत्या आणि चेहऱ्यावरचं सुरेख हास्य यामुळे गौतमीचे फोटो सुरेख आलेत. या फोटोंमध्ये तिच्या हास्याने सर्वांचे लक्ष वेधले. कही फोटोंत तिच्या मागे तिच्या घराची देखील झलक दिसते.

दिवाळीसाठी गौतमीने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस (Pink Dress Look) घातला होता. तिला तो खूप खुलून दिसत होता.

एवढंच नव्हे तिने घराबाहेर छान रांगोळी काढून, त्यात मनमोहक रंगही भरले. तिचं हे वेगळं रूप चाहत्यांना खूप आवडलं.

रांगोळी काढताना मग्न झालेली गौतमी पाहून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तुझ्यातला असणारा हा ही कलागुण पाहून मन आनंदित झालं, गौतमी तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, असं एका युजरने लिहीलं.

सकाळ पासून वाट बघत होते कधी फोटो टाकते याची अशी कमेंटही एका चाहतीने केली. तिच्या या सर्व फोटोंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

रिपोर्टनुसार, 1996 साली गौतमी पाटीलचा जन्म झाला. ती एका गरीब कुटुंबात जन्माला आली. अथक मेहनतीने ती वर आली. तिने केलेल्या नृत्याने अनेकांची मने जिंकली . आज ती नृत्याद्वारे लाखो रुपये कमावते.