दहा लाख रुपयांच्या आत घ्या जबरदस्त सनरुफ कार, पाच कारची मॉडेल आहेत भन्नाट
आल्हाददायक वातावरणात सनरुफ असलेल्या कारमध्ये ड्राईव्ह करणे सर्वांना आकर्षित करत असते. पाऊस असो किंवा हिवाळा, सनरूफ असलेल्या कारमधून प्रवास करणे हे हल्ली स्टेटस सिम्बल बनले आहे. तुम्ही कुटुंबासह सहलीला गेला असाल तर सनरुफ कार प्रवासाची मजा वाढविते. परंतू सनरूफच्या कार थोड्या महाग असतात. आम्ही तुमच्यासाठी दहा लाख रुपये किंमतीच्या कार आणत आहोत. तुम्ही यंदाच्या सणासुदीत सनरूफ असलेली कार घेण्याचा विचार करत असाल तर सर्वोत्तम फिचर्स असलेल्या स्वस्त सनरूफ कारच्या मॉडेल्सची माहिती तुमच्यासाठी

Citroen C3 Aircross या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. या कारमध्ये 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजन आहे. जे 109bhp/ 205Nm चे आऊटपूट देते.

Tata Nexon च्या XM (S) वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख रुपये आहे. या कार मॉडेलला 1.2 लिटरचे टर्बो इंजिन आहे. जे 120bhp/ 170Nm चे आऊटपुट जनरेट करते.

Kia Sonet या कारची HTX+ वेरिएंटची एक्स - शोरूम किंमत सुमारे 9.40 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजनची सोय आहे. यात अनेक प्रिमियम फिचर्स आहेत.

महिंद्र कंपनीची Mahindra XUV300 च्या W6 वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांहून कमी आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो इंजिनला 109bhp/ 200Nm चे आऊटपुट जनरेट करत आहे.

MG Astor ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 9.98 लाख रुपये आहे. यात 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजन उपलब्ध आहे, जे 110PS चे आऊटपुट देते. कारमध्ये ADAS सेफ्टी फिचरची सोय आहे.