
घरात पाल पाहिल्यानंतर अनेकांना किळस वाटते. घरात झुरळं, पाल, मुंग्या किंवा इतर कीटक दिसल्यास अनेकांना चिंता वाटते. पण काही सोप्या घरगुती उपायांनी एका मिनिटात तुम्ही कीटकांपासून सुटका मिळवू शकता.

घराची फरशी पुसताना पाण्यात काही विशिष्ट गोष्टी मिसळून तुम्ही पाल आणि इतर कीटकांना दूर ठेवू शकता. काळी मिरी पावडर, कडुलिंबाचे तेल आणि कापूर हे सर्व कीटकांना दूर ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

घर पुसताना पाण्यात काळी मिरी आणि कडुलिंबाचे तेल देखील घालू शकता. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून त्या पाण्याने घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या घरात पाल किंवा इतर कीटक दिसणार नाही.

जर तुम्हाला भिंतींवर पाल आणि कीटक दिसत असतील, तर एका ग्लास पाण्यात कडुलिंबाचे तेल, कापूर पावडर आणि काळी मिरी मिसळा. हे तयार मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. आता हे मिश्रण भिंतींवर फवारा. यामुळे पाल, झुरळे, मुंग्या आणि इतर कीटक पळून जातील.

नेप्थालिन बॉल्स किंवा डांबर गोळ्यांमुळे पाली पळून जातात. घरात वेगवेगळ्या भागांत या गोळ्या ठेवा. याच्या वासामुळे घरातील पाली पळून जातील.

घराच्या कोपऱ्यात लसणाच्या पाकळ्या ठेवल्याने पण पाली पळतात. कांदा आणि लसणाचा स्प्रे तयार करुन कोपर्यात शिंपडा. यामुळे पाल घरात येत नाही.

कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्यांमुळे तुमच्या घरातील पाली पळून जातील. यासाठी, पाणी किंवा तुपात दोन्हीची पावडर घालून लहान गोळ्या तयार करा. आता या गोळ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. यामुळे पाल घरात येणार नाहीत.