
एका मुलाखतीच्या क्लिपमुळे अभिनेत्री गिरीजा ओक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. या मुलाखती दरम्यान तिने नेसलेली निळी साडी , तिचं सौंदरय, हसू यामुळे गिरीज काही क्षणांत घराघरांत पोहोचली. मराठी प्रेक्षकांसाठी गिरूीजाचा चेहरा नवा नाही, तिने हिंदीतही बरीच काम केलं आहे, मात्र या फोटोंमुळे ती अवघा काही तासांत नॅशनल क्रश बनली. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. (Photos : Instgram)

गिरीजा काय करते, घरी कोण, काय खाते, तिला काय आवडतं, तिचं पहिलं इनकम वगैरे वगैरे असंख्य गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली. सोशल मीडियावरील तिच्या अकाऊंटवरील फॉलोअर्समध्ये रातोरत प्रचंड वाढही झाली. तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स येतात.

नुकताच गिरीजाने एक पोस्ट केली होती, त्यामध्ये ती गुजरातीत बोलत होती. ते पाहून अनेक जण थक्क झाले. गिरीजा ओक, मराठी आणइ हिंदीत तर दिसते पण अस्खलित गुजराती बोलताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. याचबद्दल गिरीजाने आता आणखी एक पोस्ट केली असून एवढं छान गुजराती कसं बोलता येतं तेही तिने या व्हिडीओत स्पष्ट सांगितलं.

मी गुजराती नाही. पण मी लहानाची मोठी झाले ते कांदिवलीमध्ये, तिथेच माझी शाळा-कॉलेज झालं. तिथेच बरेच गुजराती राहतात, त्यामुळे माझ्या अनेक मैत्रिणी गुजराती होत्या. तसंच मी गुजराती नाटकांमध्येही काम केलंय, म्हणून मला ही भाषा एवढी छान बोलता येते, असं गिरीजाने सांगितलं. मी गुजराती वाचू शकते आणि बोलू शकते, थोडंफार लिहीता यायचं असंही गिरीजा म्हणाली.

तिचा हा व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला असून तिचं गुजराती बोलणं, लहेजा पाहून चाहते थक्क झाले. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं. अरे देवा .. काय कराव तुझं... एवढं कस पटा पटा बोलत आहेस...समजू तर दे..काय ते..😂🤣. गुज्जू क्रश झालीस की काय आता..😂 सब का साथ सब का विकास..प्रत्येक भाषा ❤️ अशी एक मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली.

म्हणजे आता गुजरात मधे पण तुम्ही शाखा उघडली तर., तू खूप छान गुजराती बोलतेस, अशा बऱ्याच कमेंटस करत चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.