AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : जगबुडी नदी पुलावर टँकर उलटल्याने एक मार्गिका बंद

| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 9:51 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागाना झोडलं असून शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली, पाऊस तसेच गारपीट यामुळे शेतीपिकांचही मोठं नुकसान झालंय. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे ताजे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळीतली. पॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग...

Maharashtra News LIVE : जगबुडी नदी पुलावर टँकर उलटल्याने एक मार्गिका बंद

सलग चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याला झोडपून काढलं. या पावसाने भर उन्हाळ्यात नदी ओढे पाण्याने प्रवाहित झाल्याचं दिसून आले. जिल्ह्यातील बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळी सह गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी पावसाने ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा आणि फळबागेचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची सतत हजेरी लागली असून शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. यामध्ये एक नर आणि एक मादी बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही बिबट्यांना एकाच पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश आलं. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपेड्टस वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Apr 2026 05:30 PM (IST)

    अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक, बैठकीला देशभरातील साधू, महंत उपस्थित

    अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक

    बैठकीला देशभरातील साधू महंत उपस्थित छगन भुजबळ देखील बैठकीला उपस्थित राष्ट्रीय सुरक्षा विषयावर होणार चर्चा सत्र

  • 04 Apr 2026 05:15 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द

    एकनाोत शिंदे आज ठाण्यातच, पुढील सर्व कार्यक्रम राखीव

    पक्षाकडून देण्यात आली अधिकृत माहिती

  • 04 Apr 2026 04:54 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला आहे, एकनाथ शिंदे आज ठाण्यातच असून त्यांचे सर्व पुढील कार्यक्रम राखीव ठेवले आहेत. शिवसेना पक्षाने अधिकृतपणे ही माहिती दिली आहे.

  • 04 Apr 2026 04:47 PM (IST)

    जगबुडी नदी पुलावर टँकर उलटल्याने एक मार्गिका बंद

    मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथे जगबुडी नदी पुलावर एक टँकर उलटल्याने एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली आहे. अपघात ग्रस्त टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहे. टँकर मधील केमिकल रस्त्यावर पडल्यामुळे आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टँकर पूर्ण हटवून झाल्यानंतर साफसफाई झाली की एक लाईन चालू केली जाईल असे प्रशासनाने म्हटले आहे.

  • 04 Apr 2026 04:38 PM (IST)

    अंजनगावातील महापुरुषाचा पुतळा स्थलांतरित

    सोलापूरातील माढा तालुक्यातील अंजनगावातील महापुरुषांचा पुतळा स्थलांतरित करण्यात आला आहे. प्रभू शिवरायांचा हा पुतळा क्रेनद्वारे उचलून समोरच्या दिशेला बसवण्यात आला आहे. अंजनगावात दोन गटात झालेल्या वादानंतर अखेर पुतळा स्थलांतरित करुन बसावण्यात आला आहे.

  • 04 Apr 2026 04:31 PM (IST)

    नाशिकच्या म्हाडा घोटाळ्यावर SIT स्थापन – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    नाशिकच्या म्हाडा विषयावर SIT स्थापन केली आहे. पोलिस कमिशनरांना देखील SIT मध्ये घेतले आहे. 20 टक्के गरिबांची घरे हडपली आहेत. मोठा घोटाळा झाला आहे. काही अधिकाऱ्यांनी गडबड केली असेल तर त्यांना बडतर्फ देखील करू असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

  • 04 Apr 2026 04:19 PM (IST)

    माणसाला देव बनवू नका – दिलीप वळसे पाटील

    आम्हाला कोणी महाराज म्हणत नाही. माणसाला देव बनवू नका, आम्हीही सामान्य माणूस असून आमचं कुटुंब आणि सामाजिक आयुष्य आहे, असे नेते दिलीप वळसे पाटील यांनी  म्हटले आहे. किर्तन ऐकायला आवडत असले तरी भोंदुगिरीला विरोध असल्याचे सांगत, समाजात सकारात्मक बदल घडवणारे विचारच स्वीकारले पाहिजेत, असेही वळसे पाटील यावेळी म्हणाले.

  • 04 Apr 2026 03:58 PM (IST)

    सातपूर परिसरातील सेक्स स्कँडल आणि खंडणी प्रकरण

    नाशिकच्या सातपूर परिसरातील सेक्स स्कँडल आणि खंडणी प्रकरण. उद्योजक रवींद्र एरंडे याला न्यायालयाकडून दोन दिवसाची पोलीस कोठडी. एरंडे याने किती व्हिडिओ नेमके काढले याचा तपास होणार.

  • 04 Apr 2026 03:50 PM (IST)

    साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

    सूरत-नागपूर महामार्गावर साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात. क्रूझर गाडी उलटून अपघातात जण 2 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती. सात जण जखमी. लग्नकार्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या क्रुझर गाडीला झाला अपघात. जखमींना साखरे ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

  • 04 Apr 2026 03:27 PM (IST)

    दादांच्या विमान अपघाताचा फायनल अहवाल आल्यावर सविस्तर बोलेन – जय पवार

    दादांच्या विमान अपघाताचा फायनल अहवाल आल्यावर सविस्तर बोलेन. बारामतीकर कोणासोबत आहेत हे सर्वांना माहित आहे असं जय पवार बोलले आहेत. ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र आहेत.

  • 04 Apr 2026 03:10 PM (IST)

    एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला जाणार

    एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला जाणार. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते महत्वाच्या कामासाठी दिल्लीला जाणार आहेत.

  • 04 Apr 2026 03:03 PM (IST)

    बारामती पोटनिवडणूक, उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार यांनी पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना केला होता फोन

  • 04 Apr 2026 02:55 PM (IST)

    मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG चालकांना अल्पसा दिलासा मिळणार… मुंबईहून 18 टन ऑटो LPG छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार… 30 हजार रिक्षा चालकांपैकी 7 हजार रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरने गॅस दिला जाणार…

  • 04 Apr 2026 02:45 PM (IST)

    राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर

    राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर… अनिल जाधव यांना वंचितकडून राहुरीत उमेदवारी… पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा निर्णय

  • 04 Apr 2026 02:30 PM (IST)

    पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम- हर्षवर्धन सपकाळ

    पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य… तसेच उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करु… हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती…

  • 04 Apr 2026 02:15 PM (IST)

    भोंदू अशोक खरातच्या कथिक स्वीय सहाय्यकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी

    भोंदू अशोक खरातच्या कथिक स्वीय सहाय्यकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी. मिरगाव येथील रमेश हिंगे हा व्यक्ती अशोक खरातचा PA असल्याची चर्चा. हिंगेकडून भोंदू खरातबाबत आणखी खुलासा होण्याची शक्यता

  • 04 Apr 2026 02:06 PM (IST)

    सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा-मुख्यमंत्री

    सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे… मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन… बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, सीएमची प्रतिक्रिया

  • 04 Apr 2026 02:00 PM (IST)

    अंजनगावातील महाराजांचा पुतळा स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू

    माढा तालुक्यातील अंजनगावातील पुतळा स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवरायांचा पुतळा पूजा करून स्थलांतरित करण्यात येणार आहे. पुतळा स्थलांतरित करण्यासाठी क्रेन दाखल झाला आहे.

  • 04 Apr 2026 01:50 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यासाठी यलो अलर्ट 

    गोंदिया जिल्ह्यात तापमान वाढीची शक्यता आहे. जिल्ह्यात 38-39 अंश तापमान असेल. पुढील महिन्यात उष्णतेचा जोर वाढणार आहे. 30 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण निवळणार आहे.

  • 04 Apr 2026 01:40 PM (IST)

    वाद होतील, अशा ठिकाणी पुतळा नको -मनोज जरांगे पाटील

    पुतळे बसवले पाहिजे हे पण खरं आहे पण वाद होईल अशा ठिकाणी नको,सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा उद्देश नीट असला पाहिजे. पण पुतळ्याच्या अडून अमुक अमुक जाती अंगावर आल्या पाहिजे, हा जर उद्देश असेल तर तुम्ही खूप मोठं पाप करत आहात. मराठा समाजाने नुसता पुतळा बसवायचा म्हणून बसू नका, त्या मागचं षडयंत्र सुद्धा बघा, आता हे शोधावं लागेल की पुतळे देणारा कोण हे आम्हाला माहित नाही, बसवत कोण हे सुद्धा मला माहित नाही, ही टीम नेमकी कोणा कोणाची आहे. वाद होतील अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे बसवूच नका मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना आवाहन केले.

  • 04 Apr 2026 01:30 PM (IST)

    मनोज जरांगेंची लक्ष्मण हाकेंवर नाव न घेता टीका

    धनगर समाजाचे धर्मगुरू फरांदेबाब यांन शब्द दिला होता की, तुम्ही काळजी करू नका मराठा धनगर वाद मिटणार आहे. देवस्थानच्या ठिकाणी वाद लावून धरायचा नसतो. तिथे गेलेले काहीजण चिमणी सारखी फडफड करत होते. परंतु ते मिटलं तर खूप चांगलं झालेलं आहे. काहींना या प्रकरणातून नेता व्हायचं होतं आणि दंगली घडवायच्या होत्या, असा आरोप त्यांनी लक्ष्मण हाकेंवर नाव न घेता केला. चिखला येथे झालेला प्रकरण शंभर टक्के खरं होतं, त्या ठिकाणी मराठ्यांवर अन्याय झालेला होता, आम्ही मागे सरकणार नाही, असे ते म्हणाले.

  • 04 Apr 2026 01:20 PM (IST)

    धुळे जिल्ह्यात उष्माघात कक्षाची निर्मिती

    वाढलेल्या तापमानाचा पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. विभागाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 43 ठिकाणी उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे.

  • 04 Apr 2026 01:10 PM (IST)

    बोईसर येथील कंपनीच्या विस्तारीकरणाविरोधात आंदोलन

    बोईसर तारापूर एमआयडीसीतील सर्वात मोठी कंपनी असलेल्या विराज प्रोफाइल या कंपनीकडून 104 एकर वर केल्या जाणाऱ्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक झाले असून आज बोईसर तारापूर एमआयडीसी आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार हा एकमेव मार्ग स्थानिकांसह सर्वपक्षीयांनी रोखून धरला . सध्या विराज प्रोफाइल कंपनी ही मान वारंगडे या ठिकाणी दहा एकर जागेवर असून आत्ताच या कंपनीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रदूषणाचा सामना करावा लागतोय . या कंपनीमुळे वायू प्रदूषणासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले असून आणखीन १०४ एकरवर कंपनीच विस्तारीकरण झाल्यास बोईसर च्या पूर्वेस असलेले सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला

  • 04 Apr 2026 01:01 PM (IST)

    सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    सर्वच पक्षांनी बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायला हवा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ही निवडणूक बिनविरोध झाल्यास ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असेल असे ते म्हणाले.

  • 04 Apr 2026 12:55 PM (IST)

    वाढलेल्या तापमानाचा पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट

    धुळ्यात वाढलेल्या तापमानाचा पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 43 ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

  • 04 Apr 2026 12:45 PM (IST)

    राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांकडून सभागृहाबाहेर निषेध

    सातारा अध्यक्ष निवडीच्या गोंधळा दरम्यान झालेल्या प्रक्रियेचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध. सभागृहाबाहेर दिल्या निषेधाच्या घोषणा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जिल्हा परिषद सभापती निवडीवर बहिष्कार टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 04 Apr 2026 12:30 PM (IST)

    जळगावात गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांच्या रांगा

    जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात भारत गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. रिकाम सिलेंडर घेऊन नागरिक पहाटे पाच वाजेपासून सिलेंडर मिळण्यासाठी रांगेत उभे आहेत. सिलेंडर बुकिंग केलेल्या नागरिकांना आज बोलवण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी एजन्सीचा कार्यालय बंद असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे..

  • 04 Apr 2026 12:15 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्याकडून जैन मुनींचा मुनीर भाई म्हणून उल्लेख

    हा जैन मुनी राहिलेला नाही आजपासून मुनीर भाई झालेला आहे. यांना धर्माशी काहीही घेणं देणं नाही. जैन समाज बांधवांनी यांना समजावून सांगावं अन्यथा मराठ्यांचे पोर याला फटके देतील असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

  • 04 Apr 2026 11:55 AM (IST)

    सायखेडा-चांदोरी येथे गोदावरी नदीत जलपर्णीचा विळखा..

    सायखेडा येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ जलपर्णीची दाट वाढ झाली आहे, ज्यामुळे पाणी दूषित होण्याची समस्या वाढली आहे.  जलपर्णी सडल्याने दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले. नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलं आहे. प्रशासनाकडे तातडीच्या जलपर्णी काढण्यासाठी कारवाईची नागरिकांनी मागणी केली आहे.

  • 04 Apr 2026 11:45 AM (IST)

    महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात एका झाडावर वीज पडल्याने झाड जाळून खाक झाल

    महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात एका झाडावर वीज पडल्याने झाड जाळून खाक झालं आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसानं थैमान घातलं आहे.  एका उंच नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने क्षणात झाडाने पेट घेतला आहे.  वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जळणाऱ्या झाडाचे आगीचे गोळे आणि ठिणग्या परिसरात उडू लागल्या, ज्यामुळे मोठी घबराट पसरली आहे.  आग शेजारच्या घरांना किंवा शेतांना लागू नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी पावसातही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

  • 04 Apr 2026 11:30 AM (IST)

    भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाला ठार मारण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाचे प्रकरण…

    बच्चू कडू यांचा आवाज असलेली कथित ऑडिओ क्लिप आज तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला दिली जाणार. तर आजच दुपारी बारा वाजता भाजप आमदार प्रवीण तायडे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. आमदार तायडे यांचे भाऊ अभिजीत तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली कालच बच्चू कडू यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • 04 Apr 2026 11:15 AM (IST)

    बिबट्याची शिकारी दहशत कॅमेरात कैद

    खेड तालुक्यातील कडूस येथील धायबर शिवारात मेंढपाळाच्या डोळ्यासमोर बिबट्याने शेळीची शिकार केलीय विशेष म्हणजे काल याच ठिकाणी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला आला होता. जंगल आणि शेतशिवारात बिबट्यांना खाद्य मिळत नसल्याने बिबट्यांची भटकंती सुरु अशातच बिबट्याने मेंढ्याच्या कळपात हल्ला करुन शेळीची शिकार केली मेंढपाळाच्या डोळ्यासमोर शिकार होत असताना, मेंढपाळ बिबट्याच्या शिकारी विडिओ केला यातून बिबट्याच्या हल्ल्याची दहशत स्पष्टपणे कॅमेरात कैद झाली.

  • 04 Apr 2026 11:04 AM (IST)

    माढा तालुक्यातील अंजनगावमधील पुतळा परिसरातील पर्यायी जागा निश्चित

    माढा तालुक्यातील अंजनगावमधील पुतळा परिसरातील पर्यायी जागा निश्चित करण्यात आली आहे. गट नं-814 ऐवजी पुतळा गट-नं- 480 मध्ये एसटी महामंडळाच्या जागेत स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जेसीबीद्वारे काम संपले असून, आता मुरुम टाकण्यास सुरुवात झाली आहे.

  • 04 Apr 2026 10:50 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एसआरपीएफ भरतीत उच्चशिक्षित उमेदवार मैदानात

    छत्रपती संभाजीनगरमध्ये 291 जागांसाठी सुरू असलेल्या एसआरपीएफ भरतीसाठी तब्बल 75 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीत एक धक्कादायक वास्तव समोर आले असून, केवळ बारावी उत्तीर्ण नव्हे तर पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवारही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामध्ये इंजिनिअरिंगचे 75, बी.एस्सी (ॲग्री)चे 148, एलएलबीचा 1 उमेदवार, बी.एस्सीचे 905, बी.कॉमचे 828 आणि डी. फार्मसी शिक्षण घेतलेले उमेदवार सहभागी झाले आहेत.

  • 04 Apr 2026 10:40 AM (IST)

    स्थानिक पातळीवर वाद मिटवला ही चांगली गोष्ट झाली- जरांगे पाटील

    सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. वाद होईल अश्या ठिकाणी महाराजांचे पुतळेच बसवूचं नका ;जरांगे पाटील. पुतळे कोण विकत होत याचा शोध घेतला पाहिजे. वाद मिटल्यानंतर आता त्या ठिकाणी जाण्याची अवशकता नसल्याची जरांगे यांची प्रतिक्रिया

  • 04 Apr 2026 10:30 AM (IST)

    डोंबिवलीत ‘CBI’च्या नावाखाली 71 लाखांचा डल्ला! ‘डिजिटल अरेस्ट’चा सापळा

    डोंबिवलीत ‘CBI अधिकारी’ बनून 71 लाखांची फसवणूक. घाटकोपर पोलिसांत तक्रार असल्याचा खोटा बनाव करत “तपास CBI करत आहे” सांगत नागरिकाला जाळ्यात ओढले. अटकेची भीती आणि ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून लूट सुप्रीम कोर्टाचे बनावट आदेश पाठवून विश्वास संपादन करत. टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळली

  • 04 Apr 2026 10:20 AM (IST)

    नाशकात कार विहिरीत घटनास्थळी मंत्री झिरवाळ…

    नाशकात धक्कादायक घटना घडली. नाशकात थेट कार विहिरीमध्ये कोसळले, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. आता घटनास्थळी नरहरी झिरवाळ हे पोहोचले आहे.

  • 04 Apr 2026 10:05 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये SRPF च्या भरती प्रक्रिया सुरू

    भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवाराची कॅम्पमध्येच करण्यात आली राहण्याची व जेवण्याची निशुल्क व्यवस्था. SRPF च्या 291 जागेच्या भरतीसाठी 75 हजार उमेदवारी मैदानात. एसआरपीएफ चा नवीन गट आहे गट क्रमांक 20 वरणगाव जिल्हा जळगाव त्या गटाची ही भरती आहे.

  • 04 Apr 2026 09:55 AM (IST)

    नाशिक – दिंडोरी अपघात प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

    नाशिक –  दिंडोरी अपघात प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री 10 दहा वाजता खाजगी क्लासचे स्नेहसंमेलन झाल्यानंतर घरी परतताना अपघात झाला , ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला.

    दिंडोरी येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला लागूनच विहीर आहे. जिथे  रस्ता संपतो तिथे3 फुटावर रस्त्याच्या समोरच विहीर असल्याने कार डायरेक्ट विहिरीत पडून अपघात झाला होता.

  • 04 Apr 2026 09:43 AM (IST)

    पंढरपूर – शेकडो वर्ष जुना असलेल्या यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी

    शेकडो वर्ष जुना असलेल्या पंढरपुरातील यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.  परिसरातील मैला मिश्रित सांडपाणी या तलावात येत असल्याने पाणी प्रदूषित होऊन मासे मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.  यमाई तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने परदेशी पक्ष्यांच्या जीवा बरोबर परिसरातील नागरिकांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

  • 04 Apr 2026 09:30 AM (IST)

    नांदेड मध्ये हाणामारीत तिघांचा मृत्यू,

    नांदेड मध्ये हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला आहे.  भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून गँग वॉर असल्याची चर्चा आहे. कॅनाल रोडवर मध्यरात्री उशिरा ही घटना घडली.  घटनास्थळी फॉरेन्सिक टीम सह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून तपास सुरू आहे.  यातील एका आरोपीचा घटनास्थळी मृत्यू उर्वरित तिघांचा दवाखान्यात मृत्यू झाला.

  • 04 Apr 2026 09:12 AM (IST)

    अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका, बळीराजा पुन्हा हवालदिल

    अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावालाही अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे बागेतील संत्र्याची झाडे उन्मळून पडली. तसेच शेतात काढून ठेवलेला गहू उन्हाळी कांदा आणि संत्र्याचही नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल आहे.

  • 04 Apr 2026 09:03 AM (IST)

    बीड – सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने झोडपलं

    गेल्या चार दिवसांपासून सतत झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याला झोडपून काढलं. या पावसाने भर उन्हाळ्यात नदी ओढे पाण्याने प्रवाहित झाल्याचं दिसून आले. जिल्ह्यातील बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळी सह गारपिटीचा तडाखा बसला. काल सायंकाळी आणि रात्री उशिरा झालेल्या पावसाने वडवणी तालुक्यातील मनकर्णिका नदी प्रवाहित झाली होती. तर ताडसोन्ना येथील ओढ्याला देखील पाणी आले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पावसाने ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा आणि फळबागेचे नुकसान झाले. तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना पावसाचा फटका बसला.

  • 04 Apr 2026 09:01 AM (IST)

    सांगली – राम मंदिर चौकात बसण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला

    सांगली शहरातील राम मंदिर चौकामध्ये उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा अखेर हटवण्यात आला आहे. सांगली शहरातील शंभू प्रेमींनी पहाटे राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी केली होती. याची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने राम मंदिर चौकात धाव घेतली.  चर्चेनंतर अखेर राम मंदिर चौकात बसवण्यात आलेला पुतळा हटवण्यात आला.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर मात्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सांगली शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Published On - Apr 04,2026 8:59 AM

Follow Us
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.