AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

rain forecast : आभाळ फाटणार, पाऊस धुमाकूळ घालणार, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान हवामान विभागाकडून आता देशातील तब्बल 20 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे.

rain forecast : आभाळ फाटणार, पाऊस धुमाकूळ घालणार, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
IMD Weather Update July 11 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 10, 2026 | 7:47 PM
Share

महाराष्ट्रात पावसानं गेल्या काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे, पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. कमी वेळेत प्रचंड पाऊस झाल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. पालघर, नाशिक, पुणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर पावसाने कहर केला आहे. दरम्यान आता 11 जुलै 2026 शनिवारचा हवामान अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील तब्बल 20 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान याच काळात प्रति तास 80 किमी वेगाने जोरदार वारे देखील वाहन्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार आहे, तर पूर्व भारतामध्ये देखील वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहनही या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा?

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाचा कहर पहायला मिळू शकतो. नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच पर्वतीय प्रदेशात भूस्खलन सारख्या देखील घटना घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

गेल्या काही दिवसांपासून राज्याला पावसाने झोडपून काढलं आहे. महाराष्ट्रात आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्हा तसेच घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवसांनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका