AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shashi Tharoor: धक्कादायक! खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला, गनमॅनला बाहेर खेचत…

Congress MP Shashi Tharoor convoy attacked: केरळम राज्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. जमावातील काहींनी त्यांच्या कारमधील गनमॅनला बाहेर खेचत हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Shashi Tharoor: धक्कादायक! खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला, गनमॅनला बाहेर खेचत...
काँग्रेस, शशी थरूर, केरळमImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 04, 2026 | 9:19 AM
Share

Congress MP Shashi Tharoor convoy attacked: केरळम राज्यात विधानसभा निवडणुकीने वातावरण तापले आहे. दरम्यान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर काही जणांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही घटना मलप्पुरम जिल्ह्यातील वांडूर येथे घडली. काही लोकांनी शशी थरूर यांची कार थांबवली. त्यांच्या गनमॅनला चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शशी थरूर हे UDF उमेदवार एपी अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. थरुर यांच्या टीमनुसार, ते दोन वाहनातून प्रवास करत होते. थरूर हे पहिल्या कारमध्ये होते. त्यावेळी या कारसमोर अचानक 10-15 लोकांचा जमाव जमला. त्यांनी कार थांबवली. त्यांनी कारच्या काचांवर हात मारले. त्यांची कार पुढे जाण्यास मज्जाव केला.

गनमॅनवला झोडपले

जेव्हा थरूर यांचे गनमॅन सुरक्षेसाठी बाहेर आले. तेव्हा एका गनमॅनवर जमावाने हल्ला चढवला. त्याला कारच्या बाहेर ओढले. त्याला मारले. थरूर यांनी हा सुनियोजीत हल्ला असल्याचा आरोप केला. हा विरोधकांनी केलेला हल्ला असल्याचा आरोप थरूर यांनी केला. पोलिसांनी प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल केला. वांडूर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या जमावातील दोघांना सध्या ताब्यात घेतले आहे. हल्ला का करण्यात आला याचा पोलीस तपास करत आहेत.

राजकारण तापले

सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घटनेची माहिती आणि कारणांचा पोलीस तपास करत आहेत. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि स्थानिकांचे जबाब नोंदवले जात आहेत. शशी थरूर यांनी याप्रकरणात सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील प्रचार आणि सभांना अटकाव करणे योग्य नसल्याचे म्हटले जात आहे. केरळममधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ही घटना घडल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव आला आहे. या घटनेत थरूर यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. तर जमाव हा त्या गावातील होता की हल्ला करण्यासाठी इतर ठिकाणाहून माणसं आणण्यात आली होती याचा पोलीस तपास घेत आहेत. वांडूर मतदारसंघात UDF आणि LDF यांच्यात काँटे की टक्कर आहे. दरम्यान काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी अजून या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण यावेळी केरळममध्ये काँग्रेस आघाडी बाजी मारणार की, भाजप सुरुंग लावणार हे समोर येईल.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....