वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामने, प्रचंड लाठीमार
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोर्टात खटला चालत असलेल्या वांद्रे झोपडपट्टीबाबतचा निकाल लागला. यांनंतर झोपडपट्टी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. यादरम्यानची एक मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईतल्या वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्यास पश्चिम रेल्वेकडून सुरुवात झाली होती.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोर्टात खटला चालत असलेल्या वांद्रे झोपडपट्टीबाबतचा निकाल लागला. यांनंतर झोपडपट्टी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. यादरम्यानची एक मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईतल्या वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्यास पश्चिम रेल्वेकडून तसेच पोलिस बलाकडून सुरुवात झाली होती. या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध होत असून, या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे, काही जणांनी पोलिसांच्या दिशेनं बाटल्या फेकल्या त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे.
वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेकडून कोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रम हटाव मोहिम सुरू झाली आहे. यावेळी स्थानिकांकडून पोलीसांवर दगडफेक केल्याचंही दिसून आलं. यांनंतर पोलीसांनी झडप कारवाई करायला सुरुवात केली आहे.
Published on: May 20, 2026 06:05 PM
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण

