AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli | “औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल

Sangli | “औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल

| Updated on: May 20, 2026 | 5:51 PM
Share

ऑनलाइन औषध विक्री, ई-फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींच्या विरोधात देशभरातील केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी बुधवारी देशव्यापी बंद पुकारला. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांच्या आवाहनाला महाराष्ट्रासह देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक शहरांतील हजारो मेडिकल स्टोअर्स दिवसभर बंद ठेवण्यात आली.

सांगली शहरातही या बंदचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. मेडिकल दुकाने बंद असल्यामुळे औषधे घेण्यासाठी आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. अनेकांना आवश्यक औषधे मिळण्यासाठी इतर भागात धावपळ करावी लागली. काही ठिकाणी औषध विक्रेत्यांनी मूक मोर्चे, निदर्शने आणि धरणे आंदोलन करत सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली.

औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन औषध विक्रीमुळे छोट्या मेडिकल व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. मोठ्या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे स्थानिक मेडिकल दुकानदार आर्थिक अडचणीत सापडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Published on: May 20, 2026 05:51 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार