AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Exam 2026 Paper Leak: खिडकी नसलेली खोली, डोअर टू डोअर विक्री, नीट पेपरफुटीच्या खुलाश्याने देश हादरला

NEET-2026 पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या संघटित पेपर माफिया नेटवर्कचे एकामागून एक कारनामे उघड होत आहेत. आता हादरुन टाकणारी माहिती समोर आली आहे.

NEET Exam 2026 Paper Leak: खिडकी नसलेली खोली, डोअर टू डोअर विक्री, नीट पेपरफुटीच्या खुलाश्याने देश हादरला
neet paper leakedImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 21, 2026 | 8:30 AM
Share

NEET-2026 पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील पेपर माफिया विद्यार्थ्यांना थेट स्वतः जाऊन पेपरची ‘हार्ड कॉपी’ (छापील प्रत) पोहोचवत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आता ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही नेटवर्क, कोचिंग क्लासेसचे कनेक्शन आणि पैशांच्या देवाणघेवाणीची कसून चौकशी करत आहे. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

NEET-2026 पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या संघटित पेपर माफिया नेटवर्कचे एकामागून एक कारनामे उघड होत आहेत. आतापर्यंत हा पेपर केवळ ऑनलाइन माध्यमातूनच विकला गेल्याचे मानले जात होते. मात्र, राजस्थानच्या पेपर माफियांनी विद्यार्थ्यांपर्यंत स्वतः पोहोचून पेपरची हार्ड कॉपी देखील वाटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

परीक्षा जवळ येताच किमती घसरल्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाखो रुपये दिले, त्यांना परीक्षेपूर्वी पेपरची प्रिंटेड कॉपी उपलब्ध करून देण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात या कथित पेपरची किंमत लाखोंच्या घरात होती, परंतु परीक्षा जसजशी जवळ आली, तसतशी ही किंमत हजारांवर आली. इतकेच नव्हे तर, परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधी हा पेपर काही व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) ग्रुप्समध्ये मोफत (फ्री) फिरू लागला होता.

दिवाळीपासूनच सुरू होती प्लॅनिंग

तपास यंत्रणांच्या मते, या संपूर्ण नेटवर्कचे नियोजन गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास सुरू झाले होते. जमवारामगड येथील रहिवासी मांगीलाल आणि त्याचा भाऊ दिनेश बिंवाल यांच्यापर्यंत हा संदेश आधीच पोहोचवण्यात आला होता की, त्यांना NEET चा पेपर उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांचे आणि नातेवाईकांचे परीक्षेचे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली.

प्रिंटिंग प्रेस ते माफिया अशी झाली डील

असे सांगितले जात आहे की, प्रिंटिंग प्रेसमधून पेपर लीक झाल्यानंतर तो वेगवेगळ्या चॅनेल्सच्या माध्यमातून यश यादवपर्यंत पोहोचला. येथून यश यादव आणि इतर कथित पेपर माफियांनी दिनेश आणि मांगीलाल यांच्याशी सुमारे 45 लाख रुपयांची डील केली. मात्र, नंतर पेपरमध्ये पूर्ण प्रश्न न आल्यामुळे ही रक्कम कमी करण्यात आली. तपासात हे देखील समोर आले आहे की, आरोपींनी आधी आपल्या स्वतःच्या कुटुंबातील मुलांना फायदा पोहोचवला आणि त्यानंतर हा पेपर “मार्केट” मध्ये विकायला सुरुवात केली. विकास बिंवाल आणि यश यादव यांनी NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आणि कथितरीत्या 5 लाख ते 15 लाख रुपये घेऊन त्यांना पेपर उपलब्ध करून दिला.

ठरलेल्या ठिकाणी बोलावून दिल्या ‘फिजिकल कॉपी’

सूत्रांनुसार, २८ आणि २९ एप्रिल रोजी आरोपी राजस्थानमधील एका ठरलेल्या ठिकाणी पोहोचले, जिथे काही उमेदवार आणि त्यांच्या पालकांना पेपरची फिजिकल कॉपी (छापील प्रत) देण्यात आली. यानंतर हा पेपर ऑनलाइन माध्यमातूनही शेअर करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दिनेश बिंवाल, मांगीलाल बिंवाल, विकास बिंवाल, शुभम खरनार आणि यश यादव यांना अटक करण्यात आली आहे. तर पेपर नेटवर्कशी जोडलेल्या इतर काही संशयितांची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा आता नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूट्स, पैशांचे व्यवहार (मनी ट्रान्झॅक्शन) आणि ज्या विद्यार्थ्यांना हा कथित पेपर मिळाला होता, त्यांच्या भूमिकेचा शोध घेत आहेत.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....