मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, काय घडलं?
राष्ट्रवादीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. भेटीगाठी, नाराजीनाट्य तसेच बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच राजकीय घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील बैठकीची इन साईड स्टोरी समोर आली आणि एकच खळबळ उडाली.
राष्ट्रवादीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. भेटीगाठी, नाराजीनाट्य तसेच बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच राजकीय घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील बैठकीची इन साईड स्टोरी समोर आली आणि एकच खळबळ उडाली.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठकाही झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त तटकरे, पटेल सारखे बडे नेते नाही तर तब्बल 23 जणांनी पवारांची भेट घेल्याचं वृत्त आहे. या वृत्तावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र चर्चाना उधाण यायचं ते आलंच… त्यामुळे आता राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. जे आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक नाहीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच इच्छूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आमदारांनी शरद पवार यांची भेटही घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Published on: May 20, 2026 04:18 PM
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
वालधूनी नदीला महापूर! प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद

