AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार मोठा निर्णय? परदेशातून भारतात येताच तात्काळ बोलावली मंत्र्यांची बैठक, दिल्लीत..

इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांचे वाटोळे झाले. भारतात सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. आतापर्यंत दोनदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आजा मोठी बैठक बोलावण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार मोठा निर्णय? परदेशातून भारतात येताच तात्काळ बोलावली मंत्र्यांची बैठक, दिल्लीत..
Minister Narendra Modi Meeting
| Updated on: May 21, 2026 | 8:20 AM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दाैऱ्यानंतर भारतात परतले आहेत. भारतात येताच त्यांनी तात्काळ एक महत्वाची बैठक बोलावली. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या पंतप्रधान मोदींच्या बैठकीकडे लागले आहे. विदेश दाैऱ्यात महत्वाचे करार नरेंद्र मोदी यांच्या दाैऱ्यात झाली. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्था एका वाईट स्थितीतून जात आहे. त्यामध्येच केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक आज गुरुवारी होणार आहे. विदेश दाैऱ्याहून भारतात येताच त्यांनी या बैठकीचा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलची मोठी समस्या आहे. मागील काही दिवसात दोनदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. यासोबतच सोने न खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काही मोठे निर्णय आणि मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षातील ही मंत्रिमंडळाची पहिली बैठक असेल. मध्य पूर्वेतील संकटातून मार्ग काढण्याकरिता ही बैठक बोलावल्याचा अंदाज आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. एलपीजीच्या दरांबाबतही चर्चा सुरू असून, त्यात कोणत्याही क्षणी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडा आहे. लोकांना 12-12 तास पेट्रोल आणि डिझेलकरिता लाईनमध्ये थांबावे लागत आहे. स्थिती गंभीर होत चालली आहे.

राज्यात 1 महिन्यांचा पेट्रोल आणि डिझेला साठा असल्याचे मंत्री छगण भुजबळ यांनी कालच स्पष्ट केले. जर इराण आणि अमेरिका युद्ध पुढे काही काळ असेच सुरू राहिले तर त्याचे वाईट परिणाम सहन करावे लागतील. गेल्या 12 आठवड्यांपेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. युद्धविरामचा प्रस्ताव अमेरिकेला इराणकडून देण्यात आला. मात्र, अजून युद्धविरामाची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ