
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता महाराष्ट्राने तेथे फिरायला गेलेल्या महाराष्ट्रात आणण्यासाठी कारवाई चालू केली आहे.

महाराष्ट्र सरकारने तिथे अडकलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी हेल्पलाईन चालू केली आहे. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आपत्तीव्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधावा असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे.

सरकारने जारी केलेला हा हेल्पलाईन क्रमांक 9763405899 असा आहे.

आपल्या मदतीसाठी महायुती सरकार सदैव तत्पर असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.