
हत्ती हा जंगलातील सर्वात मोठा प्राणी आहे. जन्माच्या वेळी हत्तीच्या पिल्लाचे वजन 90 ते 120 किलो असते. त्यानंतर ते वाढत जाते. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, हत्ती शाकाहारी आहे की मांसाहारी? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

हत्ती एका वेळी 150 ते 30 किलो अन्न खातो. तसेच हत्तीचे पिल्लू एका वेळी 10 ते 12 लिटर दूध पिते. जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्यानंतर हत्ती एका वेळी 10 ते 14 लिटर पाणी पितो.

अनेकांना प्रश्न पडला असेल की हत्ती नेमका शाकाहारी आहे की मांसाहारी? काही लोकांनी या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल, मात्र अनेकांसाठी हे उत्तर धक्कादायक असेल.

हत्ती हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे. तो चुकूनही मांसाला स्पर्श करत नाही. हत्ती गवत, झाडांच्या फांद्या, लहान रोपे, ऊस, केळी आणि धान्य खातात.

शाकाहारी अन्न खाऊनदेखील हत्तीचा शरीरात खूप जास्त ताकद निर्माण होते. हत्तीला मोठे शिकारी प्राणी म्हणजेच वाघ आणि सिंहदेखील घाबरतात आणि हत्तीपासून दूर पळतात.