GK : कोणत्या देशांमध्ये सापाचे मांस लोकप्रिय आहे? वाचा यादी

Snake Meat : सापाचे मांस खाण्याची परंपरा जगातील काही विशिष्ट संस्कृतींमध्ये शतकानुशतके चालत आली आहे. काही देशांमध्ये हे मांस केवळ अन्नाचा भाग नसून ते औषधी आणि शक्तिवर्धक मानले जाते. या देशांची नावे जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 01, 2026 | 4:25 PM
1 / 5
चीन : चीनमध्ये सापाचे मांस सर्वाधिक लोकप्रिय आहे, विशेषतः दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात सापाच्या मांसाला मोठी मागणी आहे. येथे 'स्नेक सूप' हा हिवाळ्यातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. हे सूप शरीरात उष्णता निर्माण करते आणि रक्ताभिसरण सुधारते, अशी चिनी लोकांची श्रद्धा आहे.

2 / 5
व्हिएतनाम : व्हिएतनाममध्ये सापाचे मांस एक 'डेलिकसी' (विशेष पक्वान्न) मानले जाते. येथे सापाचे मांस तळून, ग्रिल करून किंवा सूपमध्ये वापरले जाते. तसेच, सापाचे रक्त आणि त्याचे हृदय 'राईस वाईन'सोबत पिण्याची तिथे मोठी क्रेझ आहे, जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

3 / 5
थायलंड : थायलंडच्या काही भागांत, विशेषतः ग्रामीण भागात सापाचे मांस खाल्ले जाते. येथे प्रामुख्याने सापाची करी किंवा 'स्टिर-फ्राय' पदार्थ बनवले जातात. पर्यकांसाठी देखील काही विशिष्ट रेस्टॉरंट्समध्ये हे उपलब्ध असते.

4 / 5
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये सापाच्या मांसाचा वापर अन्नासोबतच औषध म्हणूनही केला जातो. कोब्रा (नाग) सापाचे मांस आणि त्याचे रक्त त्वचाविकार, दमा आणि पुरुषशक्ती वाढवण्यासाठी तिथे वापरले जाते. जकार्तासारख्या शहरांत सापाच्या मांसाचे कबाब विकले जातात.

5 / 5
अमेरिका : अमेरिकेच्या दक्षिण भागात, विशेषतः टेक्सस आणि फ्लोरिडा मध्ये 'रॅटलस्नेक' खाण्याची परंपरा आहे. येथे अनेक ठिकाणी 'रॅटलस्नेक राऊंडअप' नावाचे उत्सव साजरे केले जातात, जिथे सापाचे मांस तळून स्नॅक म्हणून खाल्ले जाते.