GK : जगातील असे देश जिथे सैन्यात नोकरी करावीच लागले, कुणालाही सूट नाही

Military Service is Compulsory : जगातील अनेक देशांमध्ये आजही सैन्य सेवा (मिलिटरी सर्व्हिस) अनिवार्य आहे. येथे तरुणांना एका ठराविक वयानंतर काही काळासाठी सेना, नौदल, वायुसेना किंवा राष्ट्रीय सेवेत सहभागी होणे बंधनकारक असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Mar 31, 2026 | 7:31 PM
1 / 5
जगभरात अनेक देश आहेत जिथे सैन्य सेवा बंधनकारक आहे. अमेरिका हा जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असला तरी, तेथे सैन्य सेवा अनिवार्य नाही. मात्र, इतर अनेक देशांमध्ये ही व्यवस्था अस्तित्वात आहे.

जगभरात अनेक देश आहेत जिथे सैन्य सेवा बंधनकारक आहे. अमेरिका हा जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असला तरी, तेथे सैन्य सेवा अनिवार्य नाही. मात्र, इतर अनेक देशांमध्ये ही व्यवस्था अस्तित्वात आहे.

2 / 5

दक्षिण कोरिया या देशात जवळपास सर्व निरोगी पुरुषांना सैन्य सेवा करणे अनिवार्य असते. तसेच उत्तर कोरियामध्येही सैन्यात सेवा करणे अनिवार्य आहे. त्यामुळे या दोन्ही देशांचे सैन्य ताकदवान आहे.

3 / 5

उत्तर कोरियाने 2006, 2009, 2013 (दोन वेळा) आणि 2017 मध्ये अणुचाचण्या केल्या आहेत. उत्तर कोरिया हा अणुशस्त्रांनी सज्ज देशांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच जगातील अनेक शक्तिशाली देश त्याच्याबाबत सतर्क असतात.

4 / 5

याशिवाय इस्रायलमध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठीही सैन्य सेवा अनिवार्य आहे. स्वित्झर्लंडमध्ये पुरुषांसाठी सैन्य प्रशिक्षण आणि सेवा आवश्यक आहे.

5 / 5

तसेच फिनलंड, नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क सारख्या उत्तर युरोपातील देशांमध्येही काही प्रमाणात अनिवार्य सैन्य सेवा लागू आहे. ग्रीस, ऑस्ट्रिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि लातविया या देशांमध्येही ही व्यवस्था अस्तित्वात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us