GK : पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणते? तापमान -89 डिग्री सेल्सिअस
Earth's Coldest Place: आज आम्ही तुम्हाला पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणाची माहिती सांगणार आहोत. या ठिकाणी बाराही महिने बर्फाची चादर पहायला मिळते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
-
-
भारतात हिवाळ्याला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी तापमान घसरले आहे. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी गावोगावी शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. थंडीमुळे अनेकांची दिनचर्या बदलली आहे.
-
-
आपल्या भारतात क्वचितच तापमान शुन्याच्या खाली जाते, मात्र पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तापमान नेहमी शुन्याच्या खाली असत. आज आपण पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणाची माहिती जाणून घेणार आहोत.
-
-
पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे जिथे तापमान नेहमी शुन्याच्या खाली असते. अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावर असलेले व्होस्टोक स्टेशन हे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे.
-
-
रशियन संशोधन केंद्र असलेल्या व्होस्टोक स्टेशन येथे 1983 मध्ये -89.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, जे पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे.
-
-
अंटार्क्टिकामधील व्होस्टोक स्टेशनवर सहा महिने सूर्य उगवत नाही. येथे दिवस आणि रात्र जाणवत नाही. हे ठिकाण सहा महिने अंधारात बुडालेले असते. येथे नेहमी बर्फाची चादर पहायला मिळते.