GK : कोणता पक्षी हवेत सर्वात जास्त उंचीवरून उडू शकतो?

Bird GK : तुम्ही तुमच्या आजूबाजूला वेगवेगळे पक्षी पाहिले असतील. मात्र आज आम्ही तुम्ही जगातील सर्वात उंचीवरून उडणाऱ्या पक्षाची माहिती सांगणार आहोत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 11, 2026 | 7:35 PM
1 / 5
रुपेल्स ग्रिफॉन गिधाड - जगातील सर्वात जास्त उंचीवरून उडू शकणारा पक्षी 'रुपेल्स ग्रिफॉन गिधड' हा आहे.  या पक्ष्याने समुद्र सपाटीपासून 37,100 फूट (सुमारे 11300 मीटर) उंचीवर उडण्याचा विक्रम नोंदवला आहे. ही उंची व्यावसायिक विमाने ज्या उंचीवर उडतात त्या समकक्ष आहे.

2 / 5
विक्रमाची नोंद कशी झाली? - 29 नोव्हेंबर 1973 रोजी आयव्हरी कोस्टच्या आकाशात एका विमानाशी या पक्ष्याची टक्कर झाली होती. तेव्हा वैमानिकाने नोंदवलेल्या उंचीमुळे या पक्ष्याच्या अफाट उड्डाण क्षमतेचा जगाला उलगडा झाला.

3 / 5
कमी ऑक्सिजनमध्ये जगण्याची क्षमता - एवढ्या उंचीवर ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असते. मात्र, या पक्ष्याच्या रक्तात एका विशेष प्रकारचे 'हेमोग्लोबिन' असते, जे विरळ हवेतूनही ऑक्सिजन शोषून घेण्यास अत्यंत कार्यक्षम असते.

4 / 5
नैसर्गिक अधिवास - हे पक्षी प्रामुख्याने मध्य आफ्रिकेतील साहेल प्रदेशात आढळतात. ते डोंगराळ प्रदेश, गवताळ जमीन आणि जंगलांमध्ये अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात.

5 / 5
शरीराची रचना - हे एक महाकाय गिधाड असून त्याच्या पंखांचा विस्तार सुमारे 7 ते 8.5 फुटांपर्यंत असतो. त्यांचे वजन 6.5 ते 9 किलोच्या दरम्यान असते, ज्यामुळे त्यांना हवेतील गरम प्रवाहांचा वापर करून उंच जाणे सोपे होते.