GK : कोणत्या राज्यातील लोकांचे सरासरी उत्पन्न जास्त? महाराष्ट्राशेजारील हे राज्य आघाडीवर

Per Capita Income : भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, इतिहास आणि आर्थिक वैशिष्ट्ये आहेत. राज्यांच्या आर्थिक प्रगतीत दरडोई उत्पन्न हा सर्वात महत्त्वाचा निकष मानला जातो. आज आपण सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या राज्यांची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 30, 2026 | 6:16 PM
1 / 5
दरडोई उत्पन्न म्हणजे काय? : एखाद्या राज्यातील एकूण उत्पन्न त्या राज्याच्या लोकसंख्येने भागल्यावर मिळणाऱ्या सरासरी उत्पन्नाला दरडोई उत्पन्न म्हणतात. त्यामुळे राज्याची आर्थिक समृद्धी मोजण्यासाठी हा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो.

2 / 5
सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य : गोवा हे सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य मानले जाते. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत गोवा देशातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असले, तरी आर्थिकदृष्ट्या तो अत्यंत सक्षम आहे.

3 / 5
गोव्याची अर्थव्यवस्था मजबूत : गोव्याच्या आर्थिक विकासामागे पर्यटन, सेवा क्षेत्र आणि खाण उद्योगाचा मोठा वाटा आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात, ज्यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळते.

4 / 5
गोव्यानंतर कोणत्या राज्यांचा क्रमांक? : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गोव्यानंतर सिक्कीमचा क्रमांक लागतो. त्यानंतर दिल्ली (केंद्रशासित प्रदेश) आणि हरियाणा या भागांचाही समावेश उच्च दरडोई उत्पन्न असलेल्या प्रदेशांमध्ये होतो.

5 / 5
गोव्याचे दरडोई उत्पन्न किती? : MOSPI च्या उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, गोव्याचे वार्षिक दरडोई उत्पन्न सुमारे 3.5 लाख ते 3.57 लाख इतके आहे, जे देशातील सर्वाधिक मानले जाते.

Follow Us