GK : हिवाळ्यात तोंडातून पांढरी वाफ का बाहेर पडते?

GK : हिवाळ्यात तोंडातून पांढरी वाफ बाहेर पडणे यामागे नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारण आहे. ही वाफ म्हणजे दुसरे काही नसून, आपल्या श्वासातील बाष्प थंड हवेमुळे द्रव स्वरूपात रूपांतरित होते. यामागील कारण जाणून घेऊयात.

Updated on: Dec 02, 2025 | 7:19 PM
1 / 5
शरीराचे तापमान : मानवी शरीराचे अंतर्गत तापमान नेहमी सुमारे 37 अंश सेल्सिअस असते. आपण जो श्वास बाहेर टाकतो, त्याचे तापमान देखील शरीराच्या तापमानाइतके उष्ण असते. मात्र बाहेरील हवा की खूप थंड असते.

2 / 5
श्वासात बाष्प : आपल्या फुफ्फुसातून बाहेर पडणाऱ्या श्वासात खूप जास्त प्रमाणात पाण्याचे बाष्प असते. हिवाळ्यात आपल्या तोंडातून बाहेर पडणारे उष्ण आणि दमट बाष्प अचानक थंड हवेच्या संपर्कात येतो.

3 / 5
बाष्प-संक्षेपण प्रक्रिया : बाहेरील थंड हवा आपल्या उष्ण श्वासातील बाष्पाला वेगाने थंड करते. उष्ण बाष्प थंड झाल्यावर, त्याचे रूपांतर लगेचच लहान पाण्याच्या कणांमध्ये होते.

4 / 5
श्वास वाफेसारखा दिसतो : जेव्हा तोडातून बाहेर पडणाऱ्या बाष्पाचे तापमान एका विशिष्ट बिंदूपेक्षा खाली येते, तेव्हा बाष्प द्रवात रूपांतरित होते. हे लाखो अतिसूक्ष्म पाण्याचे कण हवेत तरंगू लागतात, ज्यामुळे ते आपल्याला वाफेसारखे किंवा धुरासारखे दिसते.

5 / 5
उन्हाळ्यात वाफ का दिसत नाही? : उन्हाळ्यामध्ये बाहेरील हवा गरम असते त्यामुळे उष्ण श्वास हवेत मिसळतो. तापमान जवळपास एकसारखे असल्यामुळे श्वास द्रवात रूपांतरित होत नाही, म्हणून वाफ दिसत नाही.