
इराण कुठे आहे? : इराण हा मध्य पूर्व प्रदेशात स्थित एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा देश आहे. आपल्या इतिहास, संस्कृती आणि भूगोलामुळे इराण नेहमीच जगभरात चर्चेत राहिला आहे.

इराण कोणत्या देशांनी वेढलेला आहे? : इराणच्या सीमा एकूण सात देशांशी जोडलेल्या आहेत. इराक, तुर्की, अझरबैजान, आर्मेनिया, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान.

समुद्राची सीमा : तुम्ही इराणचा नकाशा पाहिला, तर तो या सात देशांनी वेढलेला दिसतो. याशिवाय इराणच्या सीमा समुद्रालाही लागून आहेत. त्याच्या दक्षिणेला पर्शियन गल्फ (फारसची आखात) आणि ओमानचे आखात आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुजवर इराणचे नियंत्रण : इराण केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही ताकदवान आहे. अलीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यास जगभरात इंधन संकट निर्माण होऊ शकते, अशी परिस्थिती दिसून आली आहे.

भारतापासून इराण किती दूर आहे? : भारताची राजधानी दिल्ली ते इराणची राजधानी तेहरान यांच्यातील हवाई अंतर सुमारे 2500 ते 2700 किलोमीटर आहे. हे अंतर विमानाने सुमारे 3 ते 4 तासांत पार करता येते.