
इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यामध्ये मद्यांची किंमत फारच कमी आहे. त्यामुळे गोव्याच्या बिचवर फिरण्यासोबतच तरुणाई मद्याचा आस्वाद घेण्यासाठीही गोव्याला जायचा प्लॅन बनवतात. गोव्यात अनेक ब्रँड्सची मद्यं आवर्जुन प्राशन केली जातात.

मात्र वेगवेगळ्या ब्रँडस्ची व्हिस्की, रम, व्होडका प्रसिद्ध आहे. पण त्यामुळे गोव्यात काही मद्यांची विक्री इतरांच्या तुलनेत जास्त होते.

गोव्यात रहस्य व्होडका फारच प्रसिद्ध आहे. भारतीय स्वाद आणि सुगंध यासाठी अनेक लोक रहस्य व्होडका हे मद्य प्राशन करता. या व्होडकाची 750 एमएलची बॉटल 850 रुपयांना मिळते.

त्यानंतर गोव्यात कदंबा व्हिस्कीदेखील खूप प्रसिद्ध आहे. या व्हिस्कीला सर्वोत्तम भारतीय सिंगल-मॉल्ट व्हिस्की असा खिताब मिळालेला आहे. या कदंबा व्हिस्कीची 750 मिलीची एक बॉटल 2200 रुपयांना मिळते.

दरम्यान, काही लोक आवडीने मद्यप्राशन करत असले तरी त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. परिणामी अकाली मृत्यूही होऊ शकतो.

त्यामुळेच मद्य पिऊ नये. मद्यापासून दूर राहावे, असा सल्ला डॉक्टर देतात. (टीप- फक्त माहिती देणे हाच या स्टोरीचा उद्देश आहे. मद्य आरोग्यास हानिकारक असते. ते प्राशन करू नये.)