सोन्यात भेसळीचा खेळ सुरू; चीनचा खतरनाक डाव, ग्राहकांसोबत नेमकं काय घडतंय?

सोन्यात भेसळीचा खेळ सुरू झाला आहे. चीनने खतरनाक डाव टाकला आहे. ग्राहकांसोबत नेमकं काय घडतंय, जाणून घ्या.

| Updated on: Nov 19, 2026 | 10:48 AM
1 / 5
जगातील युद्धजन्य पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडे सोन्याच्या शुद्धतेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या सोन्यात भेसळ करण्यासाठी चीनने नवा डाव टाकल्याचा दावा करण्यात येत आहे.

जगातील युद्धजन्य पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडे सोन्याच्या शुद्धतेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या सोन्यात भेसळ करण्यासाठी चीनने नवा डाव टाकल्याचा दावा करण्यात येत आहे.

2 / 5

चीनने एक धातू पाठवण्यास सुरुवात केली आहे. चीनने पाठवलेला धातू सोन्यात भेसळ केली, तर 'बीआयएस'ला सुद्धा ओळखता येत नाही.

3 / 5

मीडिया रिपोर्टनुसार, तपासात उघड झाले आहे की, सोन्याचे वजन वाढवण्यासाठी रेनियमसारख्या जड धातूची पावरडर मिसळली जात आहे. या धातूच्या भेसळीनंतरही सोन्याच्या काही चाचण्यांमध्ये त्याची शुद्धता 24 कॅरेटपर्यंत दिसून आलीये. चीनमधून ही भारतात पावडर पाठवली जात आहे. भारतातील अनेक शहरात पावडरच्या डीलर्सचे जाळे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

4 / 5

या तपासादरम्यान चीनमधील शेन्झेनमध्ये एजंटशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी एजंटने दावा केला की, कंपनी रेनियम पावडरचे उत्पादन करतेय. भारतातील अनेक शहरांत डिलर्स आहेत. मुंबईतही एका डिलर्समार्फत एक ग्रॅम रेनियम पावडरचा नमुना मिळवण्यात आलाय.

5 / 5

जोधपूरमध्ये एका ज्वेलर्ससोबत प्रयोग करण्यात आला. या रिपोर्टनुसार, 7.83 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यामध्ये एक ग्रम रेनियम पावडर मिसळण्यात आली. त्यानंतर सोन्याचे वजन हे 8.83 ग्रॅम इतकं झाले, असा दावा केला जातोय. या चाचणीने धातूच्या मिश्रणानंतरही 24 कॅरेट सोने शुद्ध असल्याचे सिद्ध केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us