Gold Rate Hike : सोन्याचा भाव चांगलाच वाढला, एकाच दिवसात चक्क…एक तोळा दागिन्याचा भाव काय?
भविष्यातही अशीच भाववाढ होत राहिली तर दागिने खरेदी करणाऱ्यांची तसेच गुंतवणूक कराणाऱ्यांची अडचण होऊ शकते. जागतिक पातळीवर काय घडामोडी घडतात त्यावरून भविष्यात हे दर पडणार की आणखी वाढणार हे अवलंबून असेल.

सोनं हा सामान्यांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. सोन्याचा भाव वाढला की सामान्यांचे दागिने खरेदी करण्याचे स्वप्न लांबवणीवर पडते किंवा ते अधुरेही राहु शकते. म्हणूनच सोनं जेवढं स्वस्त तेवढीच सराफा बाजारात जास्त गर्दी असते.

दरम्यान, सध्या सोन्याचा तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायाल मिळाली आहे.

सोन्याच्या दरात साडे चार हजारांची तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार हजार रूपयांची वाढ झाली आहे. ताज्या भावानुसार सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा १ लाख ६० हजार ६८० रुपयांवर पोहोचले आहेत.

तर चांदीचा दर जीएसटीसह प्रतिकिलो २ लाख ४८ हजार २३० रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दागिने करायचे असतील तर सामान्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे ही दरवाढ झाली आहे.

दरम्यान, भविष्यातही अशीच भाववाढ होत राहिली तर दागिने खरेदी करणाऱ्यांची तसेच गुंतवणूक कराणाऱ्यांची अडचण होऊ शकते. जागतिक पातळीवर काय घडामोडी घडतात त्यावरून भविष्यात हे दर पडणार की आणखी वाढणार हे अवलंबून असेल.