Todays Gold rate: आनंदाची बातमी! सोन्याचे दर चांगलेच घसरले, पण खरेदी करावे की नाही?

Todays Gold rate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढचा वर्षभर सोने आणि चांदी खरेदी करु नका असे आवाहन केले. पण आज सोन्याचे दर चांगलेच घसरले असल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे नेमकं काय करावं?

| Updated on: May 27, 2026 | 3:10 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्हीही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. हे धातू सणासुदीला मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. हे खरेदी करणे शुभल असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव चांगलेच वाढत होते. आज सोन्याचे भाव घसरले आहेत.

2 / 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने आणि चांदीचे भाव वाढत असल्यामुळे देशवासींनी वर्षभर खरेदी करु नये असे आवाहन केले होते. मात्र, आज सोन्याचे भाव घसरल्यानंतर खरेदी करावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

3 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 200 रूपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5

आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 59 हजार 444 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपये द्यावे लागणार आहेत.

5 / 5

अमेरिका विधान यांच्यातील युद्ध विरामच्या चर्चेला विलंब होत असल्या कारणाने त्याचा परिणाम पुन्हा सोन्या-चांदीच्या दरावर होत असल्याची सराफ व्यावसायिक यांची माहिती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us