गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे सोन्याचा भाव वधारलेला पाहायला मिळतो आहे.

दरम्यान, सोमवारी (22 सप्टेंबर) राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. राजधानीत सोन्याचा भाव 2200 रुपयांनी वाढून थेट 1,16,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

दरम्यान, सोमवारी (22 सप्टेंबर) राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. राजधानीत सोन्याचा भाव 2200 रुपयांनी वाढून थेट 1,16,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमळे देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात ही तेजी पाहायला मिळत असल्याचे मत एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले आहे. चांदीचा भावदेखील अशाच पद्धतीने वाढलेला आहे.

सोमवारी चांदीचा भाव 4,380 रुपयांनी वाढून थेट 1,36,380 रुपये प्रति किलोवर पोहोचला. शुक्रवारी चांदीचा हाच भाव 1,32,000 रुपये होता. या वर्षात चांदीचा भाव आतापर्यंत 52.04 टक्क्यांनी वाढला आहे. भविष्यातही या मौल्यवान दागिन्यांचा भाव असाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.