
जळगावमधील सुवर्णपेठेत सोने घसरले तर दुसरीकडे चांदीने भरारी घेतली आहे. सध्या चांदी चांगलीच चमकली आहे. तर सोने सुद्धा स्पर्धेत टिकून आहे. सोन्यात चढउतार दिसून येतोय.

जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने पुन्हा नवी विक्रमी उच्चांक गाठला. चांदीत दराने तब्बल २ हजारांनी उसळी घेतली असून दरात मोठी वाढ झाली आहे


इस्रायल - इराण युद्धबंदीच्या घोषणेने सोन्या आणि चांदीचे दर घसरल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. युद्धानंतरचे धोरण निश्चित झाल्यानंतर आणखी घसरणीचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

सोन्याने चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या खिशावरील ताण कमी झाला आहे. या वर्षी सोन्याचा तोरा वाढला आहे. सोन्याने लाखाचा उंबराठा ओलांडल्याने अनेक ग्राहकांनी सराफा बाजाराची वेस काही ओलांडली नाही. पण भाव कमी झाल्यावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे.