
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. लवकरच सोन्याचा भाव दीड लाखांच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. तर चांदीचा भावही तीन लाखांचा आकडा पार करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

असे असतानाच आता सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. चांदीचा भाव 24 तासांत सात हजार रुपयांनी वाढला आहे. तर चांदीचा भावही 400 रुपयांनी वाढला आहे.

आता नव्या दरानुसार चांदीचा भाव जिएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 93 हजार 550 रुपयांवर पोहोचला आहे. चोवीस तासांत चांदीचा हा भाव 7 हजारांनी वाढला आहे. सोन्याचा भावदेखील चांगलाच वाढला आहे.

नव्या भावानुसार सोन जीएसटीसह 1 लाख 45 हजार 848 हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता सोने आणि चांदी खरेदी करायची असेल तर सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)