
बुधवारी (14 जानेवारी) सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे. चांदीचा भाव एका झटक्यात तब्बल 14143 रुपयांनी वाढला आहे. तर सोन्याचा भावही एका दिवसात तब्बल 1868 रुपयांनी वाढला. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून चांदीचा भाव तब्बल 34368 रुपये प्रति किलोने वाढला आहे. तर सोन्याचा भावदेखील गेल्या तीन दिवसांत तब्बल 5030 रुपयांनी वधारला आहे. नव्या वर्षात सोन्याचा भाव तर सातत्याने वाढताना दिसतोय.

नव्या वर्षाचा विचार करायचा झाल्यास जानेवारीमध्ये 14 दिवसांत चांदी 46755 रुपयांनी वधारली आहे. तर सोनं गेल्या 14 दिवसांत 8957 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. चांदीचा भाव सध्या विना जीएसटी 277175 रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याबाबत बोलायचे झाले तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1711 रुपयांनी वाढला असून थेट 130211 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा भाव 134117 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे भविष्यातही सोन्याचा भाव चांगलाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)