
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सध्या हा दर 97 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आगामी काळात सोन्याचे दर लवकरच 1 लाखांचा आकडा ओलांडतील अशी शक्यता जळगावच्या सराफा व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे

वर्षभरापूर्वी सोन्याचे दर 68 हजारांवर होते. वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

सोन्याच्या दरातील तेमुळे ग्राहकांना चांगला परतावा मिळत असल्याने सोने मोड करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.

वाढत्या दरांमुळे घरात लग्न समारंभ असलेल्या मंडळींव्यतिरिक्त इतर ग्राहकांनी सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक ध्येयधोरणं, चीन अमेरिका यांच्यातील ट्रेड वॉर यासह आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यामुळे सोन्याचे दर एक लाखांवर पोहचतील असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.